शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील आदिवासींचे मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:33 IST

शासन व प्रशासनाकडून केवळ गाजर : सामाजिक संस्थांमुळे मिळतोय दिलासा

पौड : मुळशी तालुक्यातील डोंगरदऱ्यात आणि गावकोसाबाहेर वर्षानुुवर्षे वस्ती करून राहणारे आदिवासी बांधव अद्यापही समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहेत. रस्ते, वीज, पाणी, हक्काचा निवारा, शिक्षण या मूलभूत सुविधांबरोबरच ते वंचित आहेत. रोजगार, रेशनकार्ड, जन्माचा दाखला या साधनांपासूनही ते दूरच आहेत.

शासन या आदिवासी बांधवांकरिता दररोज नवनव्या घोषणा करत असते. नेतेमंडळी या घोषणांचा आधार घेत आदिवासींना योजनांचे गाजर दाखवतात. एखादी योजना राबवली गेलीच तर त्याचे भांडवल करून निवडणूक कालावधीत मतदानाची परडी फिरवून त्यांचे मतदान आपल्या बाजूने वळवितात. विकासाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या पुढाºयांमध्ये रस्सीखेच सुरु असते. अशिक्षित असलेल्या या समाज ाांधवांना निवडणूक कालावधीत आमिष दाखवून त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतली जातात. पुढे मग या मतदारांना वाऱ्यावर सोडून दिले जाते.

अनेक कातकरी बांधवांना जातीचे दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड ही स्वत:चं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच नाहीत. सरकारी योजनांच्या लाभासाठी ही कागदपत्रे व सरकारी नियम अडसर ठरत आहेत.आदिवासीच्या विकासाकरिता मुळशीत किमान डझनभर सामाजिक सामाजिक संस्था काम करत आहेत. या संस्थामुळे आदिवासींच्या जीवनात काही प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये वनवासी कल्याण आश्रम, संपर्क संस्था,राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था, आदिवासी कल्याण संघ, नारी समता मंच, जीवन संवर्धन फौंडेशन, डोनेट एड सोसायटी, क्विक हील फौंडेशन, तात्या बापट स्मृती समिती आणि अलीकडील काळात आदिवासींकरिता निवारे उभे करून देण्याचे काम हाती घेतलेली रेल फॉर फौंडेशन या संस्था शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा उभारणी या क्षेत्रात अग्रक्रमाने काम करताना दिसत आहेत.

आंदेशेत गृहनिर्माण प्रकल्प

रेल फॉर फौंडेशन या संस्थेने आर्थिक सहकार्य देऊन मुळशी तालुक्यातील आंदेशे येथील कातकरी कुटुंबाना हक्काचा निवारा मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील १५ कुटुंबांसाठी जागा उपलब्ध करून सिमेंट काँक्रीटची पक्की घरे बांधून देण्यासाठी तालुक्यातील एक आगळा गृहप्रकल्प सुरु केला आहे. गृहकल्पाचे काम मागील सहा महिन्यांपूर्वी सुरु झाले झाले असून आगामी सहा महिन्यांत ते पूर्ण होऊन एक आगळा वेगळा गृहप्रकल्प निर्माण होईल, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नितीन घोडके यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे