अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गावची ग्रामपंचायत कार्यालयाची घरपट्टी व नळपट्टी अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री लावून लाऊडस्पिकर लावून घरपट्टी व नळपट्टी वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांनी ताबडतोब थकबाकी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांनी केले आहे. अवसरी खुर्द गावामध्ये शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेज चालू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खासगी होस्टेल उभी केली आहेत. तसेच गावाला १२ वाड्यावस्त्या आहेत. खालचा शिंदेमळा, टेमकरवस्ती, खडकमळा, दरेकरवस्ती, वारसुली, इंदोरेवस्ती, वायाळमळा, कराडेवाडी, कौलीमळा, खेडकर-अभंगमळा, हासवडमळा, भोरमळा आदी वाड्यावस्त्यांवर नळ पाणीपुरवठा व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. (वार्ताहर)४गावठाण व वाडीवस्तीतील ग्रामस्थांची एकूण घरपट्टी व नळपट्टी अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये थकल्याने ग्रामपंचायतीतील कामगारांचा पगार, नळ पाणीपुरवठा योजनेचे लाईट बिल भरणे अवघड झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयाने पर्यायाने ज्या ग्रामस्थांचे घरपट्टी, नळपट्टी थकीत आहे, अशा थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री लावून वसुली सुरू केली आहे.
थकबाकी वसुलीसाठी वाजंत्री
By admin | Updated: March 4, 2015 22:38 IST