शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बारामतीचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: October 9, 2016 04:17 IST

शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील

बारामती : शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल, इतका पाणीसाठा होत आहे. या तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करून तालुक्यातील दुष्काळी गावांनादेखील याच तलावातील पाणी देणे शक्य झाले. तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर दि. ११ रोजी केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी दिली. नगरपालिकेने यापूर्वी १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला. त्यानंतर जुन्या माती तलावाच्या जागेत ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तलाव २०१२मध्ये बांधण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी तलाव बांधून पूर्ण झाला. पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन दिले. नीरा डावा कालव्यावर आधारित हा तलाव पूर्ण झाला. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ टळली होती. पिण्याच्या पाण्याबाबत बारामती शहर स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीचे पाणी ते अद्ययावत जलशुद्धीकरणाने युक्त साठवण तलावामुळे पाणीटंचाई दूर झाली आहे. यापूर्वी ७३ दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव होते; त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा विकास योजना, राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेअंतर्गत पहिला १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला.त्यानंतर ३५५ दशलक्ष लिटरचा तलाव बांधण्यात आला आहे. त्यासाठी ४९ कोटी रुपये खर्च आला आहे. या तलावाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होईल. नीरा डावा कालव्याचे आवर्तन साधारणत: ४५ दिवसांचे असते. त्यामुळे टंचाईच्या काळातदेखील सलग २ महिने बारामतीकरांना पाणी देणे शक्य झाले आहे. वाढीव हद्दीत जळोची पाणी योजना, खंडोबानगर, तांदूळवाडीच्या योजना आहेत. त्याचबरोबर माळेगावची पाणीपुरवठा योजनादेखील नगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. याशिवाय, बारामतीच्या सर्व भागासाठी पाणीपुरवठा बृहत् बारामती पाणी योजनेचा आराखडा केला आहे.- योगेश जगताप;नगराध्यक्ष