शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

बारामती उपविभाग : १७.७५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 7, 2015 02:48 IST

बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर

बारामती : बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने समाधानकारक पेरण्या झाल्या नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसांत बारामती उपविभागात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. खरीप वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. बारामती कृषी उपविभागामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाच्या शुक्रवारच्या (दि. ३) अहवालानुसार दौंड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५.३५ क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर बारामती तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ३८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र सरासरीच्या तुलनेत अद्याप पेरण्या कमी आहेत. इंदापूर आणि पुरंदरमध्येही खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ८.८९ आणि ७.६८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.बारामती, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात बाजरीच्या पेरण्या होतात. बारामती तालुक्यात बाजरीच्या ९१.६९ क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर इंदापूर आणि पुरंदरमध्ये ७.६९ व १०.३१ टक्के क्षेत्रावर बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात प्रामुख्याने खरिपाचा हंगाम घेतला जातो. मात्र या परिसरात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आहे त्या पावसावर येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरण्या झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बारामतीच्या जिरायती भागात मागील चार वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाच्या जीवावरच येथील अर्थकारण चालते. त्यामुळे हा खरीप हंगाम तरी हाताशी लागावा असा धावा येथील शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)सुपे : सुपे परिसरामध्ये खरिपाच्या काही पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, काही भागांत झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया जाण्याच्या भीती आहे. त्यामुळे येथील बाजार पेठेवरही परिणाम झाला आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ६५ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मागील पावसावर बाजरी, हळवी कांदा, जनावरांचा हिरवा चारा, मूग आदी पिके घेतली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्याला एकरी साडेतीन ते चार हजार रुपये मशागतीसाठी खर्च आला. पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने खरीप पिकासाठी एकरी साडेतीन ते चार हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोळोलीचे ज्येष्ठ शेतकरी संपतराव काटे, पानसरेवाडीचे यादव कुदळे यांनी केली आहे. बोरकवाडी येथील शेतकऱ्यांनी बाजरी, हळवी कांदा आदी पिके घेतली आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांची ओल कमी होऊ लागली आहे. तसेच दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे खरीप पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती बोरकवाडी येथील शेतकरी मधुकर बोरकर यांनी दिली. बारामतीचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी यामध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी पिकांवर डीएएफ फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.