शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बारामतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांची ‘दादागिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:19 IST

बारामती शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला.

बारामती - शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला. या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले. नगरसेवकांनी केलेली अरेरावी, कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले होते.पतंगशाहनगर रिंगरोडलगत सुरू असलेले अतिक्रमण काढताना सोमवारी (दि. ११) स्थानिक नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांशी चर्चा करतो, दोन दिवसांची मुदत द्या, असे सांगितले. त्यावर अतिक्रमणविरोधी पथकाने नगरसेवकांचा मान राखून काम थांबविले.मात्र, हे अतिक्रमण काढण्यावरून काही नगरसेवकांसमवेत नगरसेवक आणि नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती समीर चव्हाण मुख्याधिकाºयांच्या दालनात गेले. यावेळी अतिक्रमणावरून मुख्याधिकाºयांनी त्यांनी अरेरावी केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर नगरपरिषद कर्मचाºयांनी निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले.याबाबत बारामती कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे यांनी सांगितले,की सफाई कामगार, इतरांना शिवीगाळ करण्याचे प्रकार घडतात. आज मुख्याधिकाºयांवर ही वेळ आली आहे. उद्या आमच्यावरदेखील वेळ येऊ शकते. या घटनेचा आम्ही निषेध करतो.कास्ट्राईब संघटनेचे नेते राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले, की म्नगरसेवकांनी नि:स्वार्थी भावनेतून कामे करून द्यावीत. आज पूर्ण दिवस मुख्याधिकाºयांना अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ कामबंद करण्यात आले आहे. दुपारी २.३० पासून हे काम बंद करण्यात आले.अधिकाºयांशी अडेलतट्टूपणाने वागाल, ते मी खपवून घेणार नाही. अलीकडे घरगडी कोणाचे ऐकत नाही. मग तुम्ही त्यांच्याशी घरगड्याप्रमाणे वागला तर कसे चालेल, अशा शब्दांत फेब्रुवारीमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांत महिन्यात चितळे यांनी स्वत:ची बदली करून घेतली. चितळे केवळ ११ महिने कार्यरत होते. या पार्श्वभूमीवर चितळे यांच्यानंतर रुजू झालेल्या मुख्याधिकाºयांना राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाकडून कडूसकर यांना अरेरावी झाल्याने या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली होती.नगरसेवक समीर चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, मुख्याधिकाºयांना हे अतिक्रमण नसताना कारवाई का केली, याची विचारणा केली. बांधकाम समिती सभापती या नात्याने तसेच नगरसेवक या नात्याने आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. याची जाणीव ठेवून केवळ विचारणा केली. त्यांच्याशी कोणतीही अरेरावी केली नाही. शहरातील सर्वसामान्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, बड्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष सुरू आहे. याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या