बारामती - हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र, याच बालेकिल्ल्यातील बारामती नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ६ जागा निवडून आल्या आहेत. ६ जागांवर विरोधात निकाल गेल्याने उपमुख्यमंत्री पवार यांना हा धक्का मानला जात आहे. या निकालाने नगरपरिषदेत शरद पवार गट, रासप, बसपाने ‘एन्ट्री’ केली आहे. तर इतर ३ अपक्ष निवडून आले आहेत. जातीय समीकरणांसह अंतर्गत नाराजी या विरोधातील निकालामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, बहुजन समाज पार्टीसह १४ उमेदवार, तर ३३ जागांसाठी १५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.अजित पवार गटाचे यापूर्वीच आठ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले होते. आज पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अजित पवार गटाचे २७ उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवार गटाने एकूण ३५ जागा जिंकल्या आहेत.
Web Summary : Ajit Pawar's faction secured victory in the Baramati Nagar Parishad election, winning 35 seats. Despite this, the opposition gained six seats. Nationalist Congress Party (Sharad Pawar group), BSP, and RSP candidates emerged victorious, signaling shifts in local political dynamics. BJP, and Shiv Sena (Shinde & Thackeray) failed to win a seat.
Web Summary : बारामती नगर परिषद चुनाव में अजित पवार गुट ने 35 सीटें जीतकर जीत हासिल की। इसके बावजूद, विपक्ष ने छह सीटें हासिल कीं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार गुट), बसपा और रासप के उम्मीदवार विजयी हुए, जो स्थानीय राजनीतिक गतिशीलता में बदलाव का संकेत देते हैं। भाजपा और शिवसेना (शिंदे और ठाकरे) एक भी सीट जीतने में विफल रहे।