शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील उद्योजक अडचणीत, अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:17 IST

मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने बारामती एमआयडीसीमधील लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या एमआयडीसीत साधारणत: ७०० ते ८०० लघुउद्योग आहेत.

बारामती : मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने बारामती एमआयडीसीमधील लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या एमआयडीसीत साधारणत: ७०० ते ८०० लघुउद्योग आहेत. मात्र, सध्या फक्त २०० ते ३०० लघुउद्योग सुरू असल्याचे चित्र आहे. मोठ्या कंपन्यांचे उत्पादक ३० ते ३५ टक्क्यांनी घटले आहे.बारामती एमआयडीसीमध्ये सर्व सोयीसुविधा असल्याने मोठ्या कंपन्यांबरोबरच अनेक लघुउद्योग सुरू करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून मात्र या उद्योगांना घरघर लागली आहे. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने काही लघुउद्योगांवर टाळे टाकण्याची वेळ आली आहे. अगदी उभारलेल्या शेडसाठी भाडेकरू मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील दिवाळीनंतर थोडासा उठाव होता. परंतु, पुन्हा घसरण आहे. साधारणत: फळ, दूध प्रक्रिया उद्योग बºयापैकी सुरू आहेत. उद्योग बंद पडल्याने लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.मध्यंतरी जीएसटीचे दरदेखील कमी करण्यात आले. परंतु, उद्योगांनी उभारी घेतली नसल्याचे चित्र आहे. सध्या दूध प्रक्रिया करणाºया उद्योगांसाठी महिला कामगार उपलब्ध होतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना अडचण नाही. मात्र, अभियांत्रिकी उत्पादन करणारे लघुउद्योग अडचणीत आले आहेत. कुशल, अकुशल कामगारदेखील बेकार झाले आहेत. यातून बाहेर कसे पडणार, अशी स्थिती आहे. एकूणच कामगारांची स्थिती बेकार राहण्यावर आली आहे.>अनेक उद्योजक अडचणीत....या संदर्भात बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले की, उत्पादन घटल्याने अनेक लघुउद्योगांना टाळे ठोकण्याची वेळ उद्योजकांना आली आहे. शेती, दूध यावर प्रक्रिया करणाºया उद्योगांना बरे दिवस आहेत. परंतु, अन्य उद्योग बंदच करण्यात आले आहे. सरकारने जीएसटीचे दरदेखील मध्यंतरी घटविले. तरीदेखील त्यामध्ये कोणताही फरक पडला नाही.