शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

बापलेकांना आॅनलाइन गंडा

By admin | Updated: July 5, 2017 03:35 IST

बँक खात्यांची माहिती घेऊन एटीएम कार्डाच्या माहितीवरून वडील आणि मुलाच्या खात्यामधून आॅनलाइन खरेदी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बँक खात्यांची माहिती घेऊन एटीएम कार्डाच्या माहितीवरून वडील आणि मुलाच्या खात्यामधून आॅनलाइन खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी संजय बेंद्रे (वय ५६, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. बेंद्रे हे खासगी लेखापरीक्षक म्हणून काम करतात. अज्ञात आरोपीने बेंद्रे यांच्या मोबाईलवर फोन केला. बँकेचे एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत हे कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मोबाईलवर आलेला मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगितले. बेंद्रे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला; मात्र बेंद्रे यांनी त्यांना कोणताही क्रमांक कळविला नाही. तरीही आरोपीने खात्याच्या माहितीचा वापर करून त्यांचे वडील श्रीधर गणेश बेंद्रे यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून १४ हजार ५५९ रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. हा प्रकार ११ आॅक्टोबर २०१६ रोजी घडला होता. थ्रीडी सिक्युअर पिन तयार करून खरेदी४ मे २०१७ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास बेंद्रे यांच्या मोबाईलवर पुन्हा एका व्यक्तीने फोन करून, त्यांना आयआरटीसीची तक्रार लॉगिन होत नसल्याचे सांगत डेबिट कार्डचा क्रमांक मागितला; मात्र बेंद्रे यांनी कार्ड क्रमांक व ओटीपी क्रमांक देण्यास नकार दिला. आरोपीने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावरून सुरुवातीला ५० रुपये आणि नंतर २० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला; परंतु, आरोपीला हे पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे त्याने थ्रीडी सिक्युर पिन तयार करून त्यांच्या खात्यामधून ९ हजार ९९९ रुपयांची खरेदी केली. पुढील तपास उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.