शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

बँक आॅफ महाराष्ट्रचा एनपीए १७ हजार कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 7:59 PM

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर बँक आॅफ महाराष्ट्राच्या अनुत्पादक खात्यांतील (एनपीए) रक्कम १७ हजार ८०० कोटी रुपये झाली आहे.

ठळक मुद्देसंचलन नफा घटला : तोट्यात झाली अकराशे कोटी रुपयांवर वाढगेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रॉस आणि नेट एनपीएमध्ये अनुक्रमे २४९ आणि २ हजार ६४ कोटी रुपयांनी घटबँकिंग क्षेत्राची मोठी रक्कम कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अडकलेली डीएसके कर्ज प्रकरण वैधच

पुणे : आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर बँक आॅफ महाराष्ट्राच्या अनुत्पादक खात्यांतील (एनपीए) रक्कम १७ हजार ८०० कोटी रुपये झाली आहे. बँकेच्या संचलन नफ्यात ५३३ वरुन ४७० कोटी रुपयांपर्यंत घट झाली असून, नक्त तोटा १ हजार ११९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याच्या आरोपावरुन बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरची पहिली तिमाही बैठक शुक्रवारी बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात पार पडली. यानंतर बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी तिमाही अहवाल जाहीर केला. त्यातून बँकेच्या तोट्यात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली. बँकेच्या दृष्टीने काहीशी जमेची बाब म्हणजे, चालू आणि बचत खात्याचे प्रमाण टिकविण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. बँकेतील ग्रॉस एनपीएची रक्कम १७ हजार ८०० कोटी असून, नेट एनपीए ९ हजार १९५ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रॉस आणि नेट एनपीएमध्ये अनुक्रमे २४९ आणि २ हजार ६४ कोटी रुपयांनी घट झाली आहे. मात्र, बँकेचा संचलन नफा ५३३ कोटी ४८ लाखांवरुन ४७० कोटी ३२ लाखांवर आला आहे. नॉन इंटरेस्ट उत्पन्नातही ४६४ कोटींवरुन ३४६ कोटीरुपयांवर खाली आला आहे. त्यातही १०४ कोटी रुपयांची घट झाली आहे. अनुत्पादक खात्यांमधून तुलनेने कमी झालेली वसुली आणि इतर तोट्यांमुळे बँकेच्या एकूण तोट्यात वाढ झाली आहे. तसेच, बँकेचा जून २०१७ साली एकूण व्यवसाय २ लाख ३३ हजार ७२४ कोटी रुपयांवरुन २ लाख १९ हजार ४५८ कोटींवर खाली आला आहे. या शिवाय गेल्या जून महिन्याच्या तुलनेत बँकेचा निव्वळ तोटा ४१२.२० कोटी रुपयांवरुन १ हजार ११९ कोटी रुपयांवर गेला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक राऊत म्हणाले, बँकिंग क्षेत्राची मोठी रक्कम कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे पर्सनल वैयक्तिक आणि वाहन लोन यासारखा किरकोळ बँकिंग व्यवसाय, कृषी, मध्यमस्वरुपाचे व्यवसाय यामध्ये पतपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाहन कर्जात ३७.७ टक्के वाढ झाली असून किरकोळ क्षेत्रातील एकूण पतपुरवठा १६.६० टक्क्यांवरुन १९.९५ टक्के झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत थकीत कजार्तून रोख वसुली ८०७ कोटी रुपयांवरुन १ हजार १२४ कोटी रुपये झाली आहे. मात्र, शेतकरी कर्जमाफी, नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलमधील (एनसीएलटी) प्रकरणे आणि गुंतवणुकीवर मिळालेला कमी परतावा यामुळे तोट्यात वाढ दिसत आहे. .....................डीएसके कर्ज प्रकरण वैधचडीएसके कर्जप्रकरणात बोलताना बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, डीएसके हे १९६९ पासून बँकेचे खातेदार आहेत. यापूर्वी त्यांचे खाते चांगल्या पद्धतीने सुरु होते. त्यांना दिलेले आत्ताचे कर्जदेखील नियमाप्रमाणेच दिले आहे. तसे ते कर्ज पूर्णपणे सुरक्षितच आहे. बँकेने डीएसके यांच्यावर वर्षभरापूर्वीच दिवाळखोरीची कारवाई केली आहे.

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी