शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागामध्ये वाळूउपशावर बंदी, लिलाव पडणार बंद, हरित प्राधिकरणाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 04:02 IST

नद्यांमधील पाण्याखालील वाळूउपसा करण्यावर राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली खंडपीठाचे न्यायाधीश स्वतंत्रकुमार, न्यायाधीश जवाद रहीम यांनी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : नद्यांमधील पाण्याखालील वाळूउपसा करण्यावर राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली खंडपीठाचे न्यायाधीश स्वतंत्रकुमार, न्यायाधीश जवाद रहीम यांनी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमधील वाळूउपशावर निर्बंध आले असून, या जिल्ह्यांमध्ये वाळूउपशाचे लिलाव बंदच पडण्याची शक्यता आहे. सक्शन पंप किंवा मानवी पद्धतीनेवाळूउपसा करण्यात येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.राष्ट्रीय हरित लवाद बार असोसिएशन विरुद्ध डॉ. सार्वभौम बंगाली या याचिकेवर खंडपीठाने निर्णय दिला असून, या खंडपीठामध्ये तज्ज्ञ सदस्य म्हणून बिक्रम सिंह सजवान आणि रंजन चॅटर्जी यांचा समावेश होता. नदीतील जैववैविध्य, नदीचा नैसर्गिक स्रोत, वहन आणि जलचर प्राणी व जीव यांच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची आहे. केवळ एखादी व्यक्ती, संस्था, कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी वाळूउपसा करण्यास परवानगी देणे पर्यावरण हिताच्या दृष्टीने घातक आणि बेकायदा आहे. त्यामुळे पुणे विभागांतर्गत पाच जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये सक्शन पंप किंवा अन्य कुठल्याही मार्गाने वाळूउपसा करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात येत असल्याचे न्या.कुमार आणि न्या.चॅटर्जी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाकडून नदी किंवा तलावांसराख्या जलाशयांमधून सक्शन पंप आणि मानवी पद्धतीनेवाळूउपसा करण्यासाठी परवानग्या दिलेल्या आहेत; मात्र या परवानग्या देताना कोणत्या नियमांचा आधार घेण्यात आला याबाबत राज्य शासनाने एनजीटीपुढे माहिती दिली नाही. शासनाला नदी, तलावामधून वाळू उपसा करण्यास परवानगी देता येत नसल्याचे पुणे खंडपीठामध्ये चाललेल्या ‘ज्ञानेश किसनराव फडतरे विरुद्ध बालाजी एंटरप्रायझेस व अन्य’ तसेच प्रफुल्ल शिवराव कदम विरुद्ध पर्यावरण खाते व अन्य’ या खटल्यांबाबतचा आदेश देताना नमूद करण्यात आले होते.राज्य शासनाने प्राधिकरणाच्या परवानगी- शिवाय सक्शन पंपाद्वारे अथवा कोणत्याही प्रकारच्या वाळूउपशाची परवानगी देऊ नये. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी अशा बेकायदा वाळूउपशाला प्रतिबंध करावा; तसेच हे प्रकार घडू नयेत म्हणून विशेष उपाययोजना कराव्यात, असे आदेश यापूर्वी देण्यात आलेले होते.यासोबतच सक्शन पंप किंवा मानवी पद्धतीने वाळूउपसा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णयही देण्यात आलेला होता; परंतु या निर्णयांचा चुकीचा अर्थ लावत राज्य शासनाने दिलेल्या वाळूउपशाच्या परवानग्या बेकायदेशीर असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. पाण्याखाली नसलेली किंवा नदी किनाºयावरीलवाळूउपसा करण्यास परवानगी आहे, परंतु नदीत सक्शन पंप किंवा मानवी स्वरूपात वाळूउपसा करण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Puneपुणे