शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेला ठोकले टाळे, मुख्याधिकाऱ्यांचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:13 IST

राष्ट्रवादी-शिवसेना नगरसेवकांचा संताप : मुख्याधिकाऱ्यांचा केला निषेध

दौैंड : दौैंड नगर परिषदेचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी दौैंड नगर परिषदेला टाळे ठोकले. दरम्यान, सर्व कामगारांना बाहेर काढून मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या कामकाजाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. साधारणत: १ तास नगर परिषदेला टाळे होते.राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मुख्याधिकारी थोरात हे हेड क्वॉर्टरला राहत नसून नगर परिषदेच्या कामकाजाला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. सध्या शहरात डेंगीची साथ सुरू आहे. शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात डेंगीचे पेंशट अ‍ॅडमिट आहेत. नगर परिषद प्रशासन मात्र ठप्प आहे.

डासांच्या बंदोबस्तासाठी औषधांची फवारणी वेळेवर होत नाही. डेंगी साथीला आळा घालण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांवर मुख्याधिकाºयांचे लक्ष व धाक नाही. आरोग्य समितीच्या सभापती, आरोग्य विभागाचे प्रमुख शाहू पाटील यांच्याशी डेंगीच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मीटिंग घेण्याविषयी बोलावले असता हे महिला सभापतीशी उद्धटपणे अरेरावीच्या भाषेत बोलतात.या निवेदनावर उपनगराध्यक्ष राजेश जाधव, इंद्रजित जगदाळे, हेमलता परदेशी, वसीम शेख, ज्योती राऊत, रिजवाना पानसरे, कांचन साळवे, संध्या डावखर, विलास शितोळे, गौैतम साळवे, संजय चितारे, ज्योती वाघमारे, अनिता दळवी, प्रणोती चलवादी, मोहन नारंग यांच्या सह्या आहेत.घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर हवे लक्षयाबाबत सर्व सदस्यांनी तक्रार करूनदेखील पाटील यांच्यावर मुख्याधिकाºयांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी मीटिंगनिमित्त हेडक्वार्टर सोडून बोहर असतात. तेव्हा मुख्याधिकाºयांनी सकाळी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांच्या कामकाजावर व घनकचरा व्यवस्थापनबाबतच्या ठेकेदारावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्याधिकाºयांनी हेडक्वार्टरला राहणे आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तसेच, विविध विकासकामे सभागृहात बहुमताने मंजूर होत असतात; मात्र अशी विकासकामे करीत असताना विश्वासात घेतले नाही. परिणामी, विकासकामांचे भूमिपूजन करतानादेखील सभागृहाची मान्यता घेणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले.

टॅग्स :Puneपुणे