शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात, अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 05:06 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला होणा-या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहिमत्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत.या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि मसापचे पदाधिकारी तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, संशोधन विभागप्रमुख व विश्वस्त गजानन केळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.प्रा. जोशी म्हणाले, ‘‘मराठी अभिमान गीत शालेय विद्यार्थी सादर करणार असून उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बालकवितांवर आधारित विशेष कार्यक्रम लेखक राजीव तांबे सादर करणार आहेत. कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि आदित्य दवणे ‘लेखनाची आनंद वाट’ या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेणार आहेत.जोशी म्हणाले, उद्याच्या साहित्य संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांसाठीची साहित्य संमेलने बंद पडली आहेत. ही मुले साहित्य आणि संमेलनाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हावार साधेपणाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय मसापच्या कार्यकारिणीने घेतला. त्यानुसार मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही संमेलने होणार आहेत.‘आम्हालाही काही सांगायचंय’ या विशेष कार्यक्रमात अनेक बालकुमार त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांचे सादरीकरण करणार आहेत. समारोपाला पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ते बालकुमारांशी संवाद साधणार आहेत.