गांजा प्रकरणी जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:16+5:302020-11-28T04:04:16+5:30

............................... लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: गांजा तस्करीतील आरोपीचा जामीन अर्ज आज विशेष न्यायाधीश व्ही. पी. आदोणे यांनी फेटाळून लावला. ...

Bail denied in cannabis case | गांजा प्रकरणी जामीन फेटाळला

गांजा प्रकरणी जामीन फेटाळला

Next

...............................

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: गांजा तस्करीतील आरोपीचा जामीन अर्ज आज विशेष न्यायाधीश व्ही. पी. आदोणे यांनी फेटाळून लावला.

जुबेर मुल्ला असे या आरोपीचे नाव आहे.

जून महिन्यामध्ये पुण्यातील कस्टम्स नार्कोटिकस सेल विभागास आंध्र प्रदेश मधून पुण्यात आलेल्या वाहनामध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. अधिकाऱयांनी छापा मारून आरोपींना पकडले व न्यायालयासमोर हजर करून येरवडा कारागृहात त्यांची रवानगी केली. या छाप्यामध्ये एकूण ८६८ किलो गांजा जप्त केला होता. तदनंतर या गुन्ह्यामधील एक आरोपी जुबेर मुल्ला याने मा. विशेष न्यायाधीश(एनडीपीएस) व्ही पी आदोणे यांच्या न्यायालयात जामिनावर मुक्तता होण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला. नार्कोटिकस सेल कस्टम्स खात्याच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. संदीप घाटे यांनी आरोपीस जामीन देण्यास विरोध केला. आरोपी जुबेर मुल्ला याचे वकिलांनी सदर गुन्हा आरोपीने केला नाही व आरोपीचा ह्या गुन्ह्याशी संबंध नाही असा युक्तिवाद केला. त्यास ॲड. घाटे यांनी हरकत घेऊन प्रचलित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडयांचे दाखले दिले व दोषारोपपत्र दाखल असले तरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जामिनावर मुक्त करता येत नाही असा युक्तिवाद केला.

आरोपी जुबेर मुल्ला हा अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना आश्रय व आर्थिक रसद पुरवण्याचे बेकायदा कृत्ये करीत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच आरोपीचा गुन्हा हा अत्यन्त गंभीर स्वरूपाचा असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे असल्याचे मत विशेष न्यायाधीश व्ही पी आदोणे यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले.

Web Title: Bail denied in cannabis case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.