शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान-वृक्ष प्राधिकरणामध्ये बेदिलीच; महिनाभरात लावायची ६० हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 04:15 IST

दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे.

पुणे : दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे. परस्परांचे फोन घेण्यावरून त्यांच्यात वाद होऊन आमचा अपमान झाला, असे सांगून बैठकच सोडण्यात आल्याचे समजते.राज्य सरकारने १ ते ३१ जुलैदरम्यान ६० हजार झाडे लावण्याचे बंधन महापालिकेला घातले आहे. त्यासाठी एकत्रित काम करण्याऐवजी श्रेय कोणाला, यावरून समिती व उद्यान यांच्यात खंडाजंगी सुरू आहे. उद्यान विभागाच्या अखत्यारीतच यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समिती होती. मुख्य उद्यान अधीक्षक समितीचे सदस्य सचिव असत. आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष व १३ सदस्यांमध्ये ६ नगरसेवक व ७ अशासकीय सदस्य, अशी समितीची रचना आहे. शहरातील वृक्षांच्या फांद्या तोडणे किंवा वृक्षच काढून टाकणे यासाठी आलेल्या अर्जांवर निर्णय घेणे, हे समितीचे मुख्य काम असून त्याशिवाय वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण अशीही कामे समितीकडे सोपविण्यात आली आहेत.वृक्षारोपणाची जबाबदारी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्यावर आहे. नियोजनासाठी घोरपडे यांनी बोलावलेल्या बैठकीत दोन अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. कामासाठी फोन केल्यानंतर फोनच घेतला जात नाही, त्यानंतर परत फोनही केला जात नाही, अशीतक्रार अधिकाºयांनी समितीच्या अधिकाºयांबाबत केली. यावरून ही वादावादी झाली. त्यात वरिष्ठ अधिकाºयांचा गैरसमज झाला व आमचा अपमान झाला, असे सांगत ते बैठक सोडून निघून गेले.स्वतंत्र कार्यालय देऊनही वाद कायमचसमितीच्या नवनियुक्त सदस्यांनी आम्हाला आमचे स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र अधिकारी हवेत, अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाने समितीसाठी स्वतंत्र कार्यालय दिले आहे. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या जागेत हे कार्यालय आहे. सदस्य सचिव म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे नियुक्त केलेले अधिकारी निवृत्त झाल्यानंतर आता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. स्वतंत्र कार्यालय व स्वतंत्र अधिकारी दिल्यानंतरही उद्यान विभाग व प्राधिकरण यांच्यातील वाद संपायला तयार नाही, हेच यातून दिसून आले आहे.गैरसमजातून काही वादकाही दुय्यम अधिकाºयांमध्ये फोन करण्यावरून शाब्दिक वाद सुरू होते. त्यातून काही गैरसमज झाले असावेत; मात्र सर्व काम एकत्रितपणेच होणार असून ६० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत.- अशोक घोरपडे,मुख्य उद्यान अधीक्षकमतभेद मिटवण्यात येतीलकाहीही वाद झाले नाहीत. दोन विभाग एकत्र आले, की असे काही होत असते. ३० हजार खड्डे खोदण्याचे काम एकत्रितपणेच झाले आहे. अपमान वगैरे काहीच नाही. कोणामध्ये मतभेद असतील, तर ते मिटवण्याचा प्रयत्न करू.- गणेश सोनुने,प्रभारी सदस्य सचिव, वृक्षप्राधिकरण समिती

टॅग्स :Puneपुणे