शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

आयुष्यात कधी ना कधी तरी ‘बॅड पॅच’ येतोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST

हे कधी करियरच्या बाबतीत होतं. तर कधी नात्यांच्या.. तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ ...

हे कधी करियरच्या बाबतीत होतं. तर कधी नात्यांच्या..

तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ सुरू असते.

कधी व्यवहारांची गणितं चुकतात, तर कधी अंदाज फसतात.

कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.

आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

मग चहूबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅड पॅच !

असा बॅड पॅच आला की, तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही. मात्र, एकदा आला की आयुष्य नकोसं करून सोडतो...कधी कधी जगण्याला फूलस्टॉप द्यावा असंही वाटून जातं.

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅडपॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

पण बॅडपॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.

आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.

आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.

बॅडपॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहातं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,

काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो

हे आपलं आपल्याला समजू शकतं...

आपली शक्तिस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.

आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.