शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 2:42 AM

मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे

- विशाल शिर्के पुणे : शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदानाची सरासरी अधिक असल्याचा अनुभव प्रत्येक निवडणुकीत येतो. मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या जिल्ह्यातील सव्वाचार लाख मतदारांपैकी शहरातील पावणेचार लाख मतदारांनी यादीसाठी छायाचित्रच उपलब्ध करून दिलेले नाही. जिल्ह्यात पर्वती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३९ हजार ५४९ मतदारांचे छायाचित्र कृष्णधवल (ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट) आहे. शहर मध्यवस्तीतील या भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे.जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील ७२ लाख २३ हजार ४२९ मतदारांपैकी तब्बल ४ लाख ३५ हजार ४१३ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.तसेच, मतदारयादीत कृष्णधवल फोटो असणाऱ्या मतदारांचे प्रमाणदेखील दोन लाखांच्या घरात आहे. मतदार यादी अद्ययावत करताना या मतदारांचे छायाचित्र घेण्याचे आव्हान निवडणूक कार्यालयासमोर आहे. विशेषत: शहरी भागात घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयामार्फत (बीएलओ) मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेक नागरिकांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिली नाहीत.जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ८ विधानसभा मतदारसंघ पुणे, ३ पिंपरी-चिंचवड आणि १० मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. य्ाा सर्व मतदारसंघात मतदार यादीत छायाचित्र नसलेले तब्बल ४ लाख ३५ हजार ४१३ मतदार आहेत. मतदार यादीत छायाचित्रच नसलेले मतदार ग्रामीण भागात अवघे ५० हजार ४७ इतके आहे. शहरात हीच संख्या तब्बल ३ लाख ४८ हजार ३६२ इतकी भरते.शहरात १ लाख ९७ हजार ५२८ मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र मतदार यादीत आहे. त्यातील १ लाख १८ हजार २७० ग्रामीण, तर ७९ हजार २५९ शहरी मतदारसंघांतील आहेत. त्यातही जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूरमधे कृष्णधवल छायाचित्रांचे प्रमाण अधिक आहे.आश्चर्यकारकरीत्या शहर मध्यवस्तीतील पर्वती विधानसभा मतदारसंघात कृष्णधवल छायाचित्र असलेल्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. फोटो नसलेल्यांच्या यादीतही वडगावशेरी मतदारसंघाचा क्रमांक जिल्ह्यात अव्वल असून, तेथील ७४ हजार ४३७ मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत.भोर-बारामतीचे मतदार जागरूक; हडपसर, खडकवासला मागेभोर आणि बारामती विधानसभा मतदारसंघांत छायाचित्र नसलेले अथवा कृष्णधवल छायाचित्र नसलेल्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.बारामतीत ४११ मतदारांचे यादीत फोटो नसून, २,६०१ मतदारांचे छायाचित्र कृष्णधवल आहे. भोरमधे कवळ १०१ मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र असून ३, १९३ मतदारांचे यादीत छायाचित्र नाही.वडगावशेरीतील ७४ हजार ४३७, हडपसरमधील ५४, ७७५ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ५३,७८४ मतदारांचे छायाचित्र यादीत नाहीत.मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, छायाचित्र नसलेल्या अथवा कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो घेण्यात येत आहेत. विशेष मतदार मोहिमेत अथवा घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नागरिकांनी यादीसाठी छायाचित्रे उपलब्ध करून द्यावीत. अशी छायाचित्रे नसल्यास यादीतून नाव वगळण्यात येणार नाही; मात्र यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- मोनिका सिंह,उपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे