शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेबी कालवा पाझरू लागल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:56 IST

गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे.

कुंजीरवाडी - गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही कर्तव्यदक्ष अधिकारी चालढकलपणा करून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत आहेत.कालव्याला लागूनच लोकवस्ती व प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. या कालव्याचे मोठ्या स्वरूपात पाझरलेले पाणी शेजारील शाळेच्या आवारात व स्थानिकांच्या घरामध्ये घुसत आहे. अगोदरच डेंग्यू, ताप अशा आजारांच्या सावटामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहे. या पाण्यामुळे वाढत चाललेली दुर्गंधी व डास यामुळे विद्यार्थी व स्थानिक बेहाल झाले आहेत. या बेबी कॅनॉलचा भराव मजबूत नसल्याने तो केव्हाही फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. अशी स्थानिक नागरिकांमध्ये सध्या चर्चा आहे. वेळोवेळी संबंधित अधिकारीवर्गाशी पाठपुरावा करून देखील या कामाची दखल कोणीही घेत नाही. मंगळवारी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आठवडे बाजार भरत असतो. शेतकाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, या कालव्याच्या पाझरण्यामुळे बाजारात त्याची अडचण होत आहे.आम्ही २०१६ पासून कार्यकारी अभियंता, खडकवासला, अधीक्षक अभियंता पाटबंधारे पुणे, उपविभागीय अभियंता मुठा कालवे स्वारगेट या सर्वांना ग्रामपंचायतीतर्फे कालव्याच्या पाझरण्याबाबत वेळोवेळी लेखी अर्ज केलेले आहेत. परंतु या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मात्र निघत नाही.- अनुराधा कुंजीर,कुंजीरवाडी सरपंचबेबी कालवा लायनिंगचा प्रस्ताव तयार केलेला असून, तो मान्य होताच काम सुरू करणार आहोत. तोपर्यंत कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथे ज्या ठिकाणी समस्या आहे ती तातडीने आम्ही दुरुस्त करणार आहोत.- शेलार,कार्यकारी अभियंता पाटबंधारे

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या