शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

आयुर्वेद हे पूर्वप्रतिबंधात्मक आणि पूर्णउपचारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

डॉ.रामचंद्र देखणे : सुश्रुत जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वेदांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन ...

डॉ.रामचंद्र देखणे : सुश्रुत जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वेदांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन पद्धती आहेत. आजार होऊ नयेत, यासाठी कशी जीवनशैली असली पाहिजे आणि आजार झाल्यास त्यावरील उपचार कसे करावेत, या दोन पद्धती आहेत. आयुर्वेद हे एकीकडे पूर्वप्रतिबंधात्मक आहे आणि त्याचबरोबर पूर्ण उपचारात्मक आहे. या दोन्ही पद्धतींमधून निर्माण होणारी उत्तम जीवनशैली आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे सुश्रुत पुरस्कार प्रदान सोहळा झाला. डॉ. पाईल्स क्लिनिक व मंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजन केले होते. या वेळी आमदार चेतन तुपे, डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. कुणाल कामठे, डॉ शर्मिला कामठे आदी उपस्थित होते. सोहळयासाठी डॉ. युनूस सोलंकी, डॉ. सीमा पाटोळे, डॉ. सार्थक पवार, डॉ. सूर्यकांत मुरुड, प्रदीप मोरे, डॉ. देव यादव, डॉ. तुषार, सुनीता पाटेकर आदींचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमात डॉ. मधुभाई कोठिया, डॉ. सुभाष वर्ष्ने, डॉ. मीना शेख (पुणे) यांना सुश्रृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. कुलदीप कोहली, डॉ. गौरी बोरकर यांना आयुर्वेद आयकॉन आणि डॉ. राजेश गुप्ता, डॉ. महफुझूल्लाह काद्री यांना सुश्रृतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रोक्टोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. व्यंकट भारद्वाज (हैद्राबाद), डॉ. प्रविण सहावे (नागपूर) यांनाही सन्मानित करण्यात आले.

चेतन तुपे म्हणाले, ‘‘आज अ‍ॅलोपॅथीला जास्त महत्त्व आले असले, तरी सुश्रुतसंहिता आणि चरकसंहितेच्या आधारावर आयुर्वेदशास्त्र पुढे जात आहे. आपल्याकडे आलेला रुग्ण पूर्ण बरा व्हावा, ही भावना ठेवून जो उपचार करतो, त्याच्या हाती यश निश्चित असते. रुग्णांसाठी धीराचे चार शब्द, उपचारातील मायेचा ओलावा हा मशिनमध्ये नसतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही पूर्वीपासूनची संकल्पना अतिशय चांगली आहे.