शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाने असाध्य ते साध्य

By admin | Updated: February 2, 2015 23:27 IST

भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान असणारी आणि अनेक वर्षांचा इतिहास असणारी उपचारपद्धती म्हणून आयुर्वेदाची ओळख आहे.

भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान असणारी आणि अनेक वर्षांचा इतिहास असणारी उपचारपद्धती म्हणून आयुर्वेदाची ओळख आहे. काळानुसार आजारांचे स्वरूप बदलले, तसेच या उपचारपद्धतीमध्येही अनेक बदल होत गेले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरही आता आयुर्वेदाने उपचार होणे शक्य आहे. विविध प्रकारच्या कॅन्सरवरील पथ्य आणि गुणकारी औषधांविषयी...न्सर हा असाध्य रोग नव्हे. त्या-त्या रोगावरची ती कष्टसाध्य, शस्त्रकर्मसाध्य अवस्था आहे, असे समजून नेमकी तपासणी व औषधी योजना केली, तर केलेली चिकित्सा शंभर टक्के फलदायी ठरते. चिकित्सेची सामान्य दिशा कफघ्न व रक्तवर्धक असावी. सर्व प्रकारच्या कॅन्सर विकारात मूळ कारणांचा शोध घ्यावा. रक्ताचे प्रमाण, रक्त खर्च होण्याचा वेळ, ईएसआर याकडे लक्ष असावे. मधुमेहाला विसरू नये. संबंधित अवयवांची स्वच्छता पाळावी. रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट काऊंट, रोगप्रतिकारशक्ती, डब्ल्यूबीसी काऊंट यांचेकडेही लक्ष असावे.प्राणवायू वापरून दूषित वायू बाहेर टाकण्याचे उत्तम काम आपले फुफ्फुस न कंटाळता करत असते. फुफ्फुसाच्या रचनेत असणारे द्राक्षासारखे घोस ब्रॉन्किया नावाने ओळखले जातात. ते घोस मोकळेपणाने प्राणवायूला खेळू देतात. त्यामुळे शुद्ध रक्ताचे अभिसरण चांगले होते. द्राक्षासारख्या घोसात कफ साठल्यामुळे ब्रॉन्कियामध्ये प्राणवायूच्या संचरणाला अडथळा येतो. मग सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा, ब्रॉन्कायटिस होते. या विविध समस्यांचे रूपांतर क्वचितच फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये होते. धूम्रपान, मशेरी, तंबाखू बंद करावी. सायंकाळी लवकर, कमी व सूर्यास्तापूर्वी जेवावे. दीर्घश्वसन, प्राणायाम करावे. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. पुदिना, आले लसूण, ओली हळद, तुळशीपाने, मिरेपूड अशी चटणी खावी. बाहेरचे खाणे, आंबवलेले, शिळे अन्न, बेकरीपाव, मेवामिठाई, मांसाहार, विविध व्यसने यामुळे नकळत मूत्रपिंडावर परिणाम होतात. पुरुषांच्या पौरुषग्रंथीवर आघात होऊन त्या वाढू लागतात. अशा अवस्थेत मल, मूत्र व वायू यांचा वेग अडविल्यामुळे तुंबून राहणाऱ्या मूत्राच्या प्रमाणामध्ये वाढ होते. अशा वाढलेल्या प्रोस्टेटग्रंथीचा रोग बळावून प्रोस्टेट कॅन्सर होत असतो. यामध्ये पोटात घेण्याकरिता शिलाजित, पिंपळलाख, वंगभस्म, कोरफडगरयुक्त लाक्षावटी उपयुक्त आहेत.आठवड्यातून एखादा तरी रुग्ण ‘माझ्या मानेची ही गाठ हात लावून बघा’ असा आग्रह करतो. काही वेळेस एकापेक्षा अनेक गाठी लहानमोठ्या स्पर्शाला कळतात. क्वचित दोन्ही बाजूला असतात. महिलांच्यात हे प्रमाण जास्त आढळते. त्यात थायरॉईडचे प्रमाण रक्ततपासणीत प्रमाणाबाहेर असलेल्या स्त्रीरुग्णांची वाढती संख्या मोठी चिंतनीय आहे. या टीबी ग्लॅन्ड असणाऱ्या कृष रुग्णांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागते, कारण शरीरात असमतोलपणा आलेला असतो. एकीकडे गाठी वाढतात, तुलनेने वजन घटते, नित्य बारीक ताप येतो. महिना दोन महिन्यांनी जास्त काळ ताप टिकतो. अरूचि, कफ, सर्दी, खोकला या तक्रारी हैराण करतात. अशा वेळेस वैद्यकीय चिकित्सकाला गाठी कमी करणे, कफविकारांना आवरणे, आहार सुधारणे अशा त्रिविध दिशांनी उपचार करावयास लागतात.बरेचसे रुग्ण काही काळ पथ्यपाणी पाळतात. औषधे घेतात. बऱ्याच वेळा झोपडपट्टीतील दुर्दैवी मुले, स्त्रिया, बेकार तरुण यांच्या टीबी ग्लॅन्डचे रूपांतर कॅन्सरग्रंथीत केव्हा होते, हे कळत नाही. रोग बळावतो. काट्याचा नायटा होतो. रुग्णाचे वजन, रक्ताचे प्रमाण घटते. रुग्णाला सतत थंडी वाजते. आहार कमी व नुसतीच औषधे इंजेक्शने घेतल्यामुळे रुग्ण बरा न होता औषधे रुग्णाला खाऊन टाकतात. अशा अवस्थेत आयुर्वेदातील त्रिरूप, षड्रूप, एकादशरूप, राजयक्ष्मा अशा रोगांच्या चिकित्सापद्धतीचा कटाक्षाने अवलंब करावा. अशा रोगांकरिता दोन वनस्पतींचे अनमोल साह्य घ्यावे. नियमितपणे दोन ते पाच लेंडी पिंपळ्या कपभर दूधपाणी एकत्र आटवावे. असे दूध सकाळी प्यावे. ताजी कांचनसाल मिळाल्यास १५/२० ग्रॅम सालीचा काढा घ्यावा. कटाक्षाने बाहेरची खाणी बंद करावी. मोकळ्या हवेत राहावे. दीर्घश्वसन, प्राणायाम, पुदीना, आले-लसूण, ओली हळद, तुळशीपाने यांची चटणी घ्यावी. पाच ग्रॅम अमरकंद वनस्पतीचा काढा घ्यावा.