शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय प्राधिकरण जागे

By admin | Updated: May 16, 2015 04:19 IST

घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र ,

सुवर्णा नवले, पिंपरी घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र , प्राधिकरण परिसरात आजही गेले कित्येक दिवसांपासून पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने नागरिकांच्या दिवसाची सुरुवात होत आहे. मात्र, खंत हीच आहे की, एवढ्या मोठ्या शहरात जागेचे सुनियोजन फक्त प्राधिकरण परिसरातच झाले आहे. यामुळेच दुर्मीळ पक्ष्यांचा किलबिलाट नागरिकांना सुखावह आहे व पक्ष्यांचे वास्तव्य टिकून राहिले आहे.पिंगळा, खंड्या ( किंंगफि शर), सुगरण, कोकिळा, रंगीत चिमण्या, पोपट, पारवे, बुलबुल, साळुंकी, मधमाश्या, घुबड आदी पक्ष्यांचे वास्तव्य प्राधिकरणात आहे. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २३ व २६मध्ये पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे सुरू होतो. पहाटे ५ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. एकत्रित समूहाने पक्षी आढळत असल्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाजाचे संगीतच तयार झाले आहे. प्राधिकरणात वृक्षांचे प्रमाण वाढल्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य टिकून आहे. मात्र, या पक्ष्यांचे वास्तव्य दीर्घ काळ टिकू न राहावे, यासाठी प्राधिकरण व महापालिकेच्या वतीने पराकाष्ठेची गरज आहे. प्राधिकरणात ५२ उद्याने आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यानाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम, कबीर, दादा-दादी पार्क, गणेश तलाव, दुर्गादेवी उद्यान, रामबाग आदी विकसित भागांमध्ये उद्याने आहेत. या भागातही पक्ष्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात जाळीदार वृक्षांमध्ये व फु लांच्या झाडांवर पक्ष्यांनी आपला निवारा केला आहे. चेरीच्या अथवा तुतीच्या वृक्षांवर कोकिळा दिसत आहे. एकाच झाडावर २५ ते ३० घरटी दिसून येत आहेत. तसेच, कोकिळेचा सुमधुर आवाज प्राधिकरणवासीयांच्या कानी पडत आहे. चिमण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. खडकवासलासारखा पक्षी संवर्धन पॅटर्न पिंपरी-चिंचवड शहरात राबविणे आवश्यक आहे. प्राधिकरण व महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समिती, पर्यावरण समितीने आजपर्यंत पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकूण ४० वर्षांच्या कालखंडात प्राधिकरणाच्या १९६६ सालच्या स्थापनेपासून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. नदीपात्रातील अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, तसेच निळ्या रेषेचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे.