शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

लेखापरीक्षकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, हेमंती कुलकर्णींकडून पोलिसांनी जुजबी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:09 IST

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली.बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. त्याचवेळी त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची पोलीस कोठडी कायम आहे. पोलिसांनी सोमवारी त्यांच्याकडे विविध माहिती विचारली़ मात्र, त्यावर त्यांनी जुजबी स्वरुपाची माहिती दिली.पुणे पोलिसांनी सुरुवातीला डी. एस. कुलकर्णी यांच्या घरी, कार्यालयांवर छापे घालून विविध कागदपत्रे जप्त केली होती. त्याची तपासणी करण्यासाठी व डी. एस. कुलकर्णी यांनी विविध कंपन्यांमार्फत स्वीकारलेल्या ठेवींच्या रकमा कोठे कोठे गेल्या, काय व्यवहार झाले, याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. त्यांच्या फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांनी नावात छोटे छोटे बदल करून एकूण ५९ कंपन्या स्थापन केल्या व त्याद्वारे लोकांकडून ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. याशिवाय त्यांनी अनेकांकडून सुमारे ३५ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जेची घेतली आहेत. ठेवी व ही असुरक्षित कर्जे मिळून एकूण १ हजार १५३ कोटी रुपये त्यांनी स्वीकारले आहेत. याशिवाय विविध बँकांची त्यांच्या २ हजार ८९२ कोटी रुपयांची कर्जे आहेत. याशिवाय ज्या लोकांनी फ्लॅट बुक केले. त्यांनी भरलेले पैसे व घेतलेली कर्जे यांची रक्कम वेगळी आहे. न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही चौकशीसाठी पोलिसांकडे ४ दिवस हजेरी देण्यास सांगितले आहे. त्यांनीही पोलिसांना तपासात काही सहकार्य केले नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सांगता येत नाही हे पाहून सांगतो, अशी उत्तरे दिली आहेत. शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे.डी. एस. के. यांची प्रकृती स्थिरदिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती आता स्थिर आहे. रविवारपेक्षा सोमवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. याबाबत डॉ. व्ही. एन. जगताप यांनी सांगितले की, त्यांना ससून रुग्णालयात लावलेला व्हेटिंलेटर रविवारी दुपारीच काढण्यात आला होता. सध्या त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत आहे. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या, त्याला अनुसरुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांची मेडिकल टीम त्यांची तपासणी करेल व त्याच्या प्रकृतीचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. त्या अहवालावरून न्यायालय पुढील निर्णय घेईल.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी