शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय संस्थांच्या ‘ऑडिट’ला राहिले पाचच दिवस; हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:24 IST

अनलॅाक नंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नव्हते.

पुणे : दरवर्षी नियमानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ एप्रिलपासून सहा महिन्यात म्हणजे ३० सप्टेंबर पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद धर्मादाय संस्थांनी सादर करायचे असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संस्थांना आपली हिशोबपत्रके वेळेत तयार करता आली नाहीत. अनलॅाक नंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नव्हते. त्यामुळे ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर व आता ‘अंतिमत:’ ३१ जानेवारी पर्यंत हे हिशोब सादर करण्यास राज्याचे धर्मादाय आयुक्त रा. ना. जोशी यांनी मुदतवाढ दिली आहे.  धर्मादाय संस्थांना आपली हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची ही शेवटची संधी आहे.

महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय संस्था व ट्रस्टना ३१ मार्च २०२० अखेरच्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण (ऑडिट) केलेले ताळेबंद (बॅलेन्स शीट) धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्याच्या पोचपावतीसह ताळेबंदाच्या प्रती स्थानिक धर्मादाय आयुक्तालयात दाखल करण्यासाठी आता केवळ पाचच दिवस राहिले आहेत.

धर्मादाय संस्थांना गेल्या वर्षातील आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षणाचे ताळेबंद ऑनलाइन पद्धतीने धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यावर त्याची पोहोच मिळते. त्यानंतर ही  पोहोच व त्यासोबत अनुसूची ‘९ ड' नुसार सर्व विश्वस्तांचे पॅन क्रमांक देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्यांबाबतचे सर्व स्रोत व त्याचा विनियोग न्यासाच्या उद्धिष्टपूर्तीसाठीच होत आहे असे नमूद केलेले सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.————————————————प्राप्तिकर विभागानेही वार्षिक अहवाल दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यास अनुसरून ज्या ट्रस्टना आपले वार्षिक हिशोबपत्रकांचे सनदी लेखापालकांकडून लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घोषित झालेल्या लॅाकडाऊन मुळे ज्या विश्वस्त संस्थांना लेखापरीक्षण सादर करणे अशक्य झाले होते अशा संस्थांनी  धर्मादाय आयुक्तालयाने दिलेल्या या अंतिम मुदतवाढीत आपले लेखापरिक्षित ताळेबंद सादर करून पुढील दंडात्मक कारवाई टाळावी- ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदारविश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे 

टॅग्स :Puneपुणे