शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘पुलं’च्या घरी नस्ती उठाठेव करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:38 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़जितसिंग राजपालसिंग टाक (२४, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे़ पोलिसांनी सांगितले, जितसिंग हा निगडी येथे एका ठिकाणी क्रिकेट खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाला मिळाली. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.जितसिंगने भांडारकर रोडवर घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. भांडारकर रोडवरील ‘मालती माधव’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात १८ डिसेंबर २०१७ रोजी हा प्रकार घडला होता़ बंद असलेली पु़ ल़ देशपांडे यांची दोन्ही घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्यांच्या घरात केवळ पुस्तके व अन्य साहित्य असल्याने त्यांनी संपूर्ण घरात उचकपाचक केली, परंतु त्यांना मौल्यवान असे काहीही मिळाले नाही. त्यांनी हे साहित्य अस्ताव्यस्त करून टाकून दिले व तेथून निघून गेले होते़पु़ ल़ देशपांडे यांचे नातेवाईक दिनेश ठाकूर यांनी अमेरिकेतून आल्यावर याविषयी फिर्याद दिली होती़ पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा हा दुसºयांदा हा प्रयत्न झाला होता़जितसिंग हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने तीन साथीदार स्वप्नील ऊर्फ चोर दाद्या रणदिवे, गणेश राठोड (दोघे रा़ बिरासदारनगर, हडपसर) आणि करणसिंग रजपूतसिंग दुधानी (२१, रा़ रामटेकडी) यांच्या मदतीने घरफोड्या केल्या. स्वप्नील याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.