शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात घडली. संबंधिताने स्वत:च्या हाताची नस कापून घेत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतले. त्यानंतर पेटलेल्या अवस्थेतच त्याने पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयानजीक मंदिरापर्यंत धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी चादर आणि पोत्याच्या साह्याने त्याच्या अंगावरील आग विझवली. त्यानंतर त्याला तत्काळ पोलीस रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. खडकी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

सुरेश पिंगळे कुटुंबीयासह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला आहे. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरीची संधी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी १ जुलैला चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान, २२ जुलैला नामसाध्यर्म्यामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलीस ठाण्यांतर्गत पिंगळे विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणालीत दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज पडताळणीसाठी पाठविण्यात आला. २७ जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला.

दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाबाहेरील तक्रार निवारण खिडकीजवळ आले. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निरसन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच पिंगळे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या इमारतीकडे पळत गेले. बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्यामागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पिंगळे यांची भेट घेतली.

-----

आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पोलिसांना पिंगळे यांची बॅग सापडली आहे. त्याठिकाणी बाटली व काडेपेटी सापडले असून याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी सातपुते चौकशी करत आहेत. पिंगळे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, याचा तपास केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.

---------------------

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येते. मात्र, आज पोलीस आयुक्तालयासमोर एकाने पेटवून घेतल्यामुळे अतिशय दुःख झाले आहे.

- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर