शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST

पुणे : मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करून तलवार, कोयत्याने वार करून त्याला ...

पुणे : मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या

टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करून तलवार, कोयत्याने वार करून

त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

दाखल केला आहे.

याबाबत राम राजू उमाप (वय २५, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर,

सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून

पोलिसांनी अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार,

अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी)

यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राम उमाप हे रविवारी आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना

अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. फिर्यादी यांनी

त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली़.

त्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ

घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले. फिर्यादी हे सोमवारी दुपारी २ वाजता वडिलांच्या घरी जाताना गिरिधर भवन चौकात अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली़ त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व जण टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला़ शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवार फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जखमी केले. अमित शेकापूर याने फिर्यादी यांना बांबूने मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने हातातील तलवारी, कोयते, पालघन व बांबू घेऊन परिसरात दहशत माजविली़. स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत.