शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:28 IST

नदीपात्रातील प्रकार : रिक्षा व डायरीवरून पटली ओळख

पुणे : रिक्षाचालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून तो नदीपात्रात टाकून देण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उघडकीस आला.

रिक्षाचालकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, हल्लेखोर आणि खुनामागचे कारण अद्याप समजले नाही़ सुनील पडवळ (४५, रा. दत्तवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक चेतन चव्हाण यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजपूत वीटभट्टीजवळ नदीपात्रातील काटवनातील मोकळ्या जागेत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली़ ही माहिती मिळताच डेक्कन पोलीस घटनास्थळी गेले़ मृतदेहाच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारून त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता़ त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता़ पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला़

मृतदेह सापडला त्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यावर रिक्षा तसेच एक डायरी सापडली़ त्यात रिक्षामालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक दिला होता़ तसेच सुनील पडवळ असे स्वत:चे नावही लिहिले होते. पोलिसांना यातील क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ती रिक्षा संदीप पासलकर यांची असल्याचे समजले. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलविण्यात आले.

त्यांनी सुनील पडवळ हा त्यांची रिक्षा भाड्याने घेऊन चालवत असल्याचे सांगितले़ सुनील हा काही वर्र्षांपूर्वी मुंबईत मिलमध्ये काम करत होता. त्या वेळी त्याच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली होती. पासलकर यांनी मृतदेह पाहिला. त्या वेळी बोटे कापलेली दिसली. त्यावरून त्यांनी हा सुनील पडवळ याचाच मृतदेह असल्याचे ओळखले. त्याला दारूचे व्यसन होते. तो राहण्यास दत्तवाडी भागात होता. मात्र, अनेक दिवस तो घरीच जात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी सुनील याचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिला़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Murderखून