शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:10 IST

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर रविवारी मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये ४ पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

वेल्हे - हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर रविवारी मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये ४ पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी,की राजगड किल्ल्यावर शनिवारी रात्री काही पर्यटक मुक्कामी थांबले होते. रविवारी सकाळी हे पर्यटक बालेकिल्ला सर करत होते. त्यावेळी बालेकिल्ल्यावरून काही युवकांचा गोंगाट ऐकायला मिळाला. मधमाश्यांचे पोळे उठले असल्याने काही युवक धावत खाली येत होते. त्यावेळी पंकज जगदाळे, आशिष पाटील, युवराज अहिरे, प्रतीक चवर (सर्व रा. आळंदी) या पर्यटकांवर मधमाश्यांनी हला केला. माश्यांनी चावे घेतल्याने हे चौघे गंभीर जखमी झाले. तसेच घाबरून पळताना पडल्यामुळे अंगावर जखमाही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. गाडावर ताक विकणाऱ्या संतोष ढेबे यांनी जखमींना मदत करत आडोशाला नेले. गडाच्या पायथ्याशी असणाºया गुंजवणे येथील पोलीस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी जखमींवर गावात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना खासगी वाहनातून नसरापूर येथील रुग्णालयात दाखल केले.राजगडावर अनेक ठिकाणी अतिशय जुनी अशी अनेक आग्या मोहोळे असून पर्यटकांकडून आशा ठिकाणाहून जाताना मोहोळांना दगड मारणे, आरडओरडा करणे असे प्रकार घडतात. येणाºया पर्यटकांनी आपल्या जीवाचा विचार करून धोका न स्वीकारता गडभ्रमंती करावी जेणेकरून काही अपघात होणार नाही. गडावर दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. - बाळकृष्ण रसाळ,पोलीस पाटील, गुंजवणे

टॅग्स :Puneपुणे