शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महापालिकेकडून पुणेकरांना खगोलविश्वाची सैर; राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये तारांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 17:41 IST

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी तारांगणाचा करून दिला परिचयज्येष्ठ नेते, मुंबईतील नेहरू तारांगणाचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकार्याचे आश्वासन : बागूल

पुणे : महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. रशियन तंत्रज्ञानाच्या ध्वनीचित्रफिती व चष्म्याशिवाय दिसणारी त्रिमीतीय दृष्य हे या तारांगणाचे वैशिष्ट्य असून असे तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे.तारांगणासाठी पुढाकार घेणारे माजी उपमहापौर, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी या तारांगणाचा परिचय करून दिला. माजी आमदार उल्हास पवार यावेळी उपस्थित होते. सतत ६ वर्षे पाठपुरावा केला. पक्षनेते, आयुक्त व सर्वसाधारण सभा यांचे सहकार्य मिळाले व त्यातूनच मागील ३ वर्षे प्रयत्न करून अवकाशातील ही सृष्टी इथे आणण्यात यश मिळाले असे त्यांनी सांगितले. दिवंगत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे नाव तारांगणाला देण्यात आले आहे. विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी लवकरच ते खुले करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याच्या सात माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या महिनाअखेरीस त्याचे उद्घाटन होणार आहे.साडेनऊ मिटरचा व्यास असणारा गोलाकार डोम असून त्यावर सर्व त्रिमीतीय दृष्ये दिसतील. एकूण ८ प्रोजेक्टर आहेत. त्याच्या साह्याने या डोमवर दृष्य साकार होते. आसनांची रचनाही मागे अगदी रेलून बसता येईल अशी केली आहे. त्यामुळे बरोबर डोळ्यांच्या वरच्या बाजूला हा गोलाकार डोम येतो. त्यामुळे आपण अंतराळातच आहोत असा भास होतो. संपुर्ण प्रेक्षागार वातनुकुलीत आहे. एकूण ५२ आसने आहेत. अंतराळातील घडामोडींवर आधारीत रशिया तसेच नासाने बनवलेले लघुचित्रपट यात दाखवण्यात येणार आहेत. खगोल अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांना यातून अंतराळ संशोधनाची आवड निर्माण होईल तसेच ग्रह, तारे, पृथ्वी, सूर्य, चंद्र यांचे स्वरूपही जाणून घेता येईल.महापालिकेने या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्धल बागूल यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यूत विभागाचे अधिक्षक अभियंता रामदास तारू, कार्यकारी अभियंता महेंद्र शिंदे व अभियंता ओंकार गोहाड यांनी विद्यूतची सर्व कामे केली. या फिल्म दाखवायचे तंत्रही संबधित कंपनी महापालिकेच्या कर्मचाºयांना देणार आहे. तीन वर्षे या कंपनीकडेच या प्रकल्पाच्या देखभालदुरूस्तीची जबाबदारी आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळात एकूण ८ शो होतील. त्यात सायंकाळी ५पर्यंतचे शो शालेय विद्यार्थ्यांसाठी असतील. त्यानंतर ५ पासून ८ पर्यंत नागरिकांसाठी खुले असेल. त्याचे शुल्क सर्वसाधारण सभा मान्य करेल तेवढे असेल. ते माफक असावे असे सुचवले आहे. साडेनऊ मिटरचा व्यास असणारा गोलाकार डोम असून त्यावर सर्व त्रिमीतीय दृष्ये दिसतील. एकूण ८ प्रोजेक्टर आहेत. त्याच्या साह्याने या डोमवर दृष्य साकार होते. आसनांची रचनाही मागे अगदी रेलून बसता येईल अशी केली आहे. त्यामुळे बरोबर डोळ्यांच्या वरच्या बाजूला हा गोलाकार डोम येतो. त्यामुळे आपण अंतराळातच आहोत असा भास होतो. संपुर्ण प्रेक्षागार वातनुकुलीत आहे. एकूण ५२ आसने आहेत. अंतराळातील घडामोडींवर आधारीत रशिया तसेच नासाने बनवलेले लघुचित्रपट यात दाखवण्यात येणार आहेत. खगोल अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांना यातून अंतराळ संशोधनाची आवड निर्माण होईल तसेच ग्रह, तारे, पृथ्वी, सूर्य, चंद्र यांचे स्वरूपही जाणून घेता येईल.महापालिकेने या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्धल बागूल यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यूत विभागाचे अधिक्षक अभियंता रामदास तारू, कार्यकारी अभियंता महेंद्र शिंदे व अभियंता ओंकार गोहाड यांनी विद्यूतची सर्व कामे केली. या फिल्म दाखवायचे तंत्रही संबधित कंपनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. तीन वर्षे या कंपनीकडेच या प्रकल्पाच्या देखभालदुरूस्तीची जबाबदारी आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळात एकूण ८ शो होतील. त्यात सायंकाळी ५पर्यंतचे शो शालेय विद्यार्थ्यांसाठी असतील. त्यानंतर ५ पासून ८ पर्यंत नागरिकांसाठी खुले असेल. त्याचे शुल्क सर्वसाधारण सभा मान्य करेल तेवढे असेल. ते माफक असावे असे सूचवले आहे. शरद पवार यांचे सहकार्यतारांगणात येण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेक्षकांचा त्रास होणार नाही. तारांगण पहायला येणाºयांसाठी दोन प्रतिक्षागृह आहेत. तिथे त्यांना शो पाहण्यापुर्वी प्राथमिक माहिती दिली जाईल. शो पाहून झाल्यानंतर काही शंका असतील तर त्याची उत्तरेही दिली जातील. यासाठी ज्येष्ठ नेते व मुंबईतील नेहरू तारांगणाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती बागूल यांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAba Bagulआबा बागुलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका