शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आकाशनिरीक्षण प्रदूषणाच्या विळख्यात : डॉ. जयंत नारळीकर; खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:58 IST

अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देआकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले : डॉ. प्रकाश तुपे निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा : राम ताकवले

पुणे : पूर्वीचे आणि आताचे पुणे यात कमालीचा फरक पडला आहे. उपनगरे विस्तारली आहेत. शहर आणि उपनगरे ‘प्रकाश’ प्रदूषणाच्या छायेखाली आहेत. आकाशनिरीक्षण करताना प्रकाश नको असतो. त्यामुळे निरीक्षणासाठी शहरांपासून लांब जावे लागते. कारण, आकाशनिरीक्षण प्रकाश प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी केले.अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वनमहर्षी मारुती चितमपल्ली उपस्थित होते. डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, ‘आकाश तुपे यांच्याशी माझा पूर्वीपासूनचा परिचय आहे. हडपसरला शेतात राहताना तुपे यांना आकाशदर्शनाची गोडी लागली. एकदा उल्कावर्षाव दिसणार आहे, असे समजल्यावर तुपे यांच्या विनंतीवरून मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ‘रात्रीच्या वेळी शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी’, असे पत्र लिहिले. सुरक्षेच्या कारणास्तव असे करता येणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करणारे उत्तर त्यांच्याकडून मिळाले’.‘१९९१ च्या सुमारास एन. सी. राणा यांच्या मदतीने आयुका नुकतीच अस्तित्वात आली होती. त्या वेळी पुण्यातील सर्व खगोलशास्त्र संस्थांची एकत्रित बैठक बोलावली होती. या सर्व संस्थाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न त्या काळी राहून गेला होता. तो अजूनही करता येईल, अशी आशा आहे’, असेही ते म्हणाले.विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले.

तुपे म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर, डॉ. राम ताकवले, मारुती चितमपल्ली यांसारख्या दिग्गजांचा सहवास मला लाभला. तोंड बंद ठेवले आणि डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले. आकाशाप्रमाणे जंगलाच्याही प्रेमात पडलो.’

राम ताकवले म्हणाले, ‘ज्ञानाने प्रश्न सुटणार असतील, जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक होणार असेल, तर त्या शिक्षणाचा मूलभूत उद्देश पूर्ण होतो. ज्ञान केवळ ज्ञानासाठी मिळवायचे की जीवनासाठी, हे आपण ठरवायला हवे. चौकटीपासून मुक्त होणे, निसर्गाच्या जवळ जाणे, वैश्विकता, व्यापकता आत्मसात करणे हेच खऱ्या अर्थाने मूल्यात्मक शिक्षण आहे. निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.’

विवेक देशपांडे संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना निसर्गाचा परिचय तसेच गड-किल्ले, जंगलाचे दर्शन घडवत आहेत. शिस्तबद्ध कार्यक्रमातून हे ज्ञानार्जन केले जाते. मात्र, आजपर्यंत या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. तरीही, ते अविरतपणे कार्यरत आहेत.- मारुती चितमपल्ली 

टॅग्स :Puneपुणे