शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पवनाथडी जत्रेत ज्योतिषांनी घातली भुरळ

By admin | Updated: February 4, 2015 00:48 IST

मुलीच लग्न जमत नाही, पैसाला पैसा लागत नाही, चार चाकीची मोठी अपेक्षा आहे, मनासारखी नोकरी नाही, मुलाबाळांचे प्रश्न सुटतील, मनासारखा जोडीदार मिळत नाही,

पिंपरी : मुलीच लग्न जमत नाही, पैसाला पैसा लागत नाही, चार चाकीची मोठी अपेक्षा आहे, मनासारखी नोकरी नाही, मुलाबाळांचे प्रश्न सुटतील, मनासारखा जोडीदार मिळत नाही, अधिकारी बनायचे स्वप्न अपुरे राहिले आहे, शिक्षणावर लक्ष नाही, मोठं घबाड हाती लागणार आहे, तुमचेच मित्र तुमच्या वाईटावर आहेत. लोकांना तुमचे चांगले पहावत नाही, अपघातामधून बचाव झालेला आहे, मरणाच्या दारातून माघारी आलेला आहात. या सर्व समस्या २ ते ३ महिन्यात सुटतील असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे पवनाथडीतील ज्योतिषी देण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात काही संकटे येणार आहेत. गुरू आणि शनीची साडेसाती आहे. भविष्यातील प्रगतीकरिता अंगठीत अमुक राशीचा खडा घाला , गळ्यात अमुक दोरा बांधून घ्या, देवाच्या दर्शनाला जावा, कुलदैवतांचा विसर पडला आहे, हे सर्व भविष्यवाणी वर्तविली जात आहेत. यासाठी फ कत ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. गळ्यात पंचा, वाढलेली दाढी आणि केसांचा बुचडा, कपाळाला भला मोठा गंध आणि विभूत, डोक्याला फे टा, बंडी आणि धोतर, हातात अंगठ्या आणि गळ्यात माळा व वडीलोपार्जित चालत आलेला व्यवसाय असे चित्र आहे भविष्य सांगणाऱ्या पवनाथडी जत्रेतील हरिभाऊ हिरामण वाईकर यांचे आहे. रहिवासी मूळचे बारामतीचे. बोलण्याची ऐट अशी की, समोरचाही विचारचक्रात गुंतून जातो. बोलण्याच्या ओघात समस्यांना त्रासलेल्या व्यक्ती सर्व काही आपल्या समस्या सांगायला सुरूवात होते. व अशाच प्रकारचा अंदाज घेऊन प्रश्नांची उत्तरे देण्याचे स्वरुप बदलज जाते हे नित्यनियमाचे ठरलेले आहे. शेवटी ज्योतिषी होऊनच पुन्हा विचारायला सुरूवात करतो की, ’तुमचे प्रश्न काय असतील तर सांगा. तुम्ही बोललात तर तुमच्या मनातील प्रश्न आम्हांला समजतील. तुमच्या ग्रहांची स्थिती सध्या खराब आहे. मी योग्य तो मार्ग सांगतो.’ असे म्हणून नागरिक आपले प्रश्न मांडण्यास सुरूवात करायचे. जोपर्यंत मनातील शंका संपत नाहीत. तोपर्यंत नागरिक हेलपाटे मारायचे थांबत नाहीत. पैसा ही घालवायचा आणि वेळही. निष्पन्न मात्र काही होत नाही. काही तरूण व सुशिक्षित मंडळी नुसतीच मजा म्हणून भविष्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. हात दाखवायचे व रेषांचे ज्ञान माहिती करुन घ्यायचे. (प्रतिनिधी)४पवनाथडी जत्रेत भविष्य पाहणाऱ्या ज्योतिषांना स्टॉलच्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे. दिवसाला ज्योतिषांनी १००० ते २००० हजार रुपये कमावले आहेत. लोकांचे नशीब कोठे दडले आहे. याचा दाखला या व्यक्तीनी दिलेला आहे. रोज एक गाव फि रणारी ही ज्योतिष मंडळी त्यांना रोज पोटापाण्यासाठी रोज एका गावात जायचे व जिथे चांगला व्यवसाय होईल अशा ठिकाणी दप्तर मांडायचे. पवनाथडीत महिला बचत गटांच्या ठिकाणी ज्योतिषांना जागा कशी काय मिळाली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.४जत्रेत एखादा व्यक्ती जाता येता नजरेत भरला की, लगेच हात करायचा व लांबूनच त्या व्यक्तीच्या पेहरावावरून व हावभावावरुन पटेल असे एखादे वाक्य सांगायचे. यामुळे समोरच्या व्यक्तीला भविष्य ऐकण्याची उत्सुक्ता लागते. भविष्य पाहणारा माणूस समोर बसला की, हळूच पिशवीतून एखाद्या देवाचा फ ोटो काढायचा आणि या देवावर तुम्ही श्रद्धा ठेवा तुमचे भले होईल. कर नाही त्याला डर कशाला असे बोलायचे आणि..‘जीवाला जीव देणारी माणसे आहेत. तुम्ही देवाला मानत नसला तरी देव तुमचं भले करेल. भविष्य सांगण्याची किंमत मोजावी लागते. मग भविष्यवाणी खरी की खोटी याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मोठ्यामोठ्या लोकांची भविष्य आम्ही वर्तवली आहेत. रोज एका गावाला असतो आम्ही. बसा काय आहे ते खरं आणि नीट सांगतो.’ मग एकदा गाव समजलं की त्या गावातील राजकारणी मंडळीची माहिती सांगायला सुरूवात करणे आणि ओळखीच्या माणसाचा दाखला देणे.