शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मुल्यमापन प्रमुखाने पैसे घेऊन वाढवले विद्यार्थ्यांचे गुण; सिंबॉयसिसमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:16 IST

१७८ मुलांबाबत घडला प्रकार

पुणे : बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुनर्मुल्यमापन करताना १८७ विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचा प्रकार सिंबॉयसिसच्या दुरस्थ शिक्षण विभागात घडला आहे. याबाबत सिंबॉयसिस संस्थेच्या डिस्टन्स लर्निंगचे रजिस्टार नामदेव आनंदा कुंभार (वय ५८) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी संदीप हेंगळे (रा. गुलमोहर अपार्टमेंट, सिंहगड रोड) आणि सुमित कुमार (रा. हैद्राबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबॉयसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे़ संदीप हेंगळे हेसिंबॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्या करीता बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन सुमित अग्रवाल या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले व त्याचे पेपरचे गुण वाढविले़ दरम्यान, ही माहिती संस्थेला कळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली.त्यात संदीप हेंगळे आणि सुमित कुमार यांनी विद्यापीठाचे ग्रेस मार्क पॉलिसीचे उल्लंघन करुन एकूण १७८ विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर कुंभार यांनी संस्थेच्या वतीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.