शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:55 IST

पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले.

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे़ ही माहिती आपण दोन दिवसांत देऊ, असे आश्वासन डी़ एस़ कुलकर्णी यांनी पोलिसांना दिले आहे़ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर २०१७ रोजी कुलकर्णी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाने त्यांना ५० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे़ परंतु, गेल्या महिन्याभरापासून ते पैसे भरण्यास कुलकर्णी यांना अपयश आले आहे़त्यामुळे गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत दररोज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले़ त्याप्रमाणे कुलकर्णी दाम्पत्य बुधवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहिले होते़ गुरुवारीही त्यांची दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली़>चौकशीत डीएसकेंकडे मागण्यात आलेली माहिती बांधकाम व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवसाय करता़ सध्या करीत असलेल्या सर्व व्यवसायाची कागदपत्रे, भारतात कोणकोणते बांधकाम प्रोजेक्ट अपूर्णावस्थेत आहेत़परदेशातील बांधकाम प्रकल्प, विविध व्यवसायांमध्ये परिवारातील कोणकोणत्या व्यक्ती मदत करतात़ निधी कोठून मिळवला़ कायमस्वरुपी व तात्पुरता स्टाफ किती़ सर्वांकडे मिळून किती वाहने आहेत़ पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावे महाराष्ट्र बँक, बाजीराव रोड शाखेतील २ खात्यांची माहिती, २००७ पासून डीएसके ग्रुप कंपन्या, संचालकांचे सर्व पॅन क्रमांक, विवरणपत्रे, कुटुंबातील सर्व सदस्य व संचालकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची यादी, ग्रुपमधील सदस्य, संचालकांच्या ट्रस्टची कागदपत्रे, आयकर विवरणपत्रे, ज्या कंपनी, फर्ममध्ये भागीदार आहात त्या कंपनीमधून आपण आपल्या वैयक्तिक खर्चासाठी किती रक्कम काढल्याचा तपशील.आपल्या पत्नीने वैयक्तिक कारणासाठी कोणत्या बँकांकडून कर्ज घेतली त्याची कागदपत्रे, बँक आॅफ बडोदा, जळगाव जनता सहकारी बँकेकडून पत्नीने किती कर्ज कशासाठी घेतले व कोठे वापरले याची माहिती, आपल्या कुटुंबाच्या नावे विमा कंपनीमध्ये किती रकमेची विमा, ठेव, गुंतवणूक केलेली आहे़तसेच म्युच्युअल फंड व शेअर्सच्या कोणत्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक असा सर्व तपशील देण्याची मागणी पोलिसांनी कुलकर्णी यांच्याकडे केली असून दोन दिवसात ही माहिती देतो, असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे़>हेमंती कुलकर्णी यांचा७ कोटींचा विमाहेमंती कुलकर्णी यांच्या नावे ७़२० कोटी रुपयांचा विमा व म्युच्युअल फंड असून १़१८ कोटी रुपयांचे शेअर्स, विद्या सहकारी बँक, अनल्स प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीजचे शेअर्स घेतले आहे़ त्याबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे़ हेमंती कुलकर्णी यांना मिळत असलेल्या मालमत्तेच्या भाड्याबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे़डीएसके यांचा मुलगा शिरीष यांच्या ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटबाबत बरीच चर्चा झाली आहे़ पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यांचे लग्न कधी, कोठे तसेच लग्नात किती खर्च केला आहे़ या खर्चासाठी आपण रक्कम कशी उभी केली, याचीही कागदपत्रे मागण्यात आली आहे़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी