पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे शुक्रवारी १७ फेब्रुवारी पुण्यात रोड शो व जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ चव्हाण यांची सायंकाळी ६़३० वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील जुना जकातनाका पटांगणात सभा होणार आहे़ सायंकाळी ७़३० वाजता रास्ता पेठ - रविवार पेठ येथे रोड शोचे आयोजन केले आहे़ त्यानंतर रात्री ८़३० वाजता ओस्वाल बंधू समाज कार्यालयात व्यापाऱ्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
अशोक चव्हाण यांचा आज रोड शो, जाहीर सभा
By admin | Updated: February 17, 2017 05:03 IST