शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 02:43 IST

इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.

बिजवडी : इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. कारण, हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, आमचेही ते नेते आहेत असे चव्हाण म्हणाले. आगामी लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याचे संकेत मिळत आहेत अशी माहितीदेखील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.चव्हाण हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी बावडा येथे आले होते. त्यानंतर परतीच्या मार्गावर चव्हाण यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या, तरी आम्ही दोन्ही निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास आमची काहीही अडचण निर्माण होणार नाही. आम्ही त्या निवडणुका हिमतीने लढवून दाखवू, जिंकून दाखवू असे चव्हाण म्हणाले. पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा अद्याप निर्णय झाला नाही.या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, कर्मयोगी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार व शरद काळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.>नारायण राणे हे काँग्रेस पक्षात येणार आहेत असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, मला त्याबाबत काहीही माहिती नाही.माझ्याशी त्याबद्दल नारायण राणे व बाळासाहेब थोरात काहीच बोलले नाहीत. यापूर्वीच राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगत राणे यांना चिमटा काढला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९