शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक स्वच्छतेची ‘ऐशी तैशी’

By admin | Updated: November 12, 2014 23:11 IST

बारामती शहरातील शासकीय इमारतींचे मोठय़ा धूमधडाक्यात जुलै महिन्यात उद्घाटन करण्यात आले. एकाच इमारतीत अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित होणार आहेत.

प्रज्ञा कांबळे  - बारामती
बारामती शहरातील शासकीय इमारतींचे मोठय़ा धूमधडाक्यात जुलै महिन्यात उद्घाटन करण्यात आले. एकाच इमारतीत अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे साहजिकच कामानिमित्त येणा:या नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, देखभालीअभावी शहरातील प्रशासकीय भवनाची अवस्था दयनीय झाल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले आहेत. 
अवघ्या चार महिन्यांतच प्रशासकीय भवनाची ही अवस्था झाल्याने इमारती देखण्या झाल्या; मात्र त्यांची देखभाल होत नसल्याने काही महिन्यांतच प्रशासकीय भवनातील बकालपणात वाढ झाली आहे. एकाच छताखाली अनेक प्रशासकीय कार्यालये आणल्याने साहजिकच तालुक्यातील ग्रामस्थांची कामानिमित्त रोज या ठिकाणी गर्दी होते. मात्र, कोणत्या कार्यालयातील भाऊसाहेब कोणत्या ठिकाणी बसतात, याचे निर्देशक फलक कार्यालयांवर न लावल्यामुळे येणा:या नागरिकांचा वेळ वाचण्याऐवजी भाऊसाहेबांना शोधण्यातच भरपूर वेळ वाया जातो. त्याचप्रमाणो कार्यालयाचा किंवा भाऊसाहेबांचा पत्ता विचारण्यासाठी शिपाई गाठावा, तर तोही हजर नसल्याचे दिसून आले. शिपाई असला तरी तो गणवेशात नसल्याने अनेकांना तो कामानिमित्त आलेला ग्रामस्थच वाटतो. त्यामुळे भल्यामोठय़ा इमारतीत नागरिकांना कार्यालय शोधताना या मजल्यावरून त्या मजल्यावर पायपीट करावी लागत आहे. येथे अद्यापही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कचराकुंडय़ा, बाक तसेच स्वागतकक्षासह अनेक सोयींचा बोजवारा उडाला आहे.  स्वच्छतागृहाअभावी महिलावर्गालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरेशा बाकांअभावी नागरिकांना खाली जमिनीवर बसावे लागत आहे. स्वच्छतेअभावी या भवनातील प्रत्येक कक्ष हा धुळीने भरलेला आहे. 
 
4महागडय़ा फर्निचरवर धुळीचे अक्षरश: थर साचले आहेत. तसेच, दोन कक्षांमधील जागाही साफ करण्यात येत नाही. दुस:या मजल्यावर असणा:या सभागृहाशेजारील मोकळ्या जागेलाच कर्मचा:यांनी कचराकुंडीचे रूप दिले आहे.
4 ‘मीटिंग हॉल’मध्ये असलेल्या टेबलावरसुद्धा धुळीचे थर साचलेले आहेत. असेच थर प्रत्येक पायरीवर पाहावयास मिळतात. अगदी भिंतीला पोपडे पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या इमारतीच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित होत आहे. सर्व मजल्यांवर तसेच उभ्या असलेल्या खांबावरही काही व्यक्तींनी पान तसेच तंबाखू सेवन करून त्यांचे शिंतोडे उडवलेले आहेत.
4 महिला तसेच पुरुषांसाठी येथे दोन्ही मजल्यांवर स्वच्छतागृह आहेत. मात्र, यातील फक्त तळमजल्यावरील स्वच्छतागृहे वापरण्यात येत आहेत. उरलेली स्वच्छतागृहे बंद आहेत. महिलांसाठीची स्वच्छतागृह अतिशय खराब अवस्थेत आहे. स्वच्छतागृहाला वापरण्यासाठी पाणीही पुरेशा प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांची मोठय़ा प्रमाणात कुचंबणा होते. 
 
सद्य:स्थितीला प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वृक्षारोपणासह अन्य कामे सुरू आहेत. प्रांत, तहसील, दुय्यम निबंधकसह अन्य कार्यालये सुरू झाली आहेत. इमारतीच्या आवारात थुंकू नये, यासाठी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमे:यांची नजर चुकवून कामानिमित्त आलेले महाभाग, काही कर्मचारी पान, तंबाखू, गुटखा खाऊन भिंती रंगवतात. स्वच्छतागृहांमध्ये तर थांबूदेखील वाटत नाही.त्यामुळे या इमारतीच्या परिसरात राडारोड, थुंकणा:यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.