शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

By विश्वास मोरे | Updated: June 10, 2023 15:49 IST

पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला...

देहूगाव (पुणे) : जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३८ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी दोनला सुरुवात झाली आहे. 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष आणि देहुतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर सुरू झालेला आहे. देहू नगरीतील भक्तीरंग गहिरा झाला आहे. सोहळा शनिवारी सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला.

आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. 

श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शाळा मंदिर, या ठिकाणची महापूजा पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरात पहाटे अडीच वाजले पासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री संत तुकाराम महाराज मंदिर, मुख्यमंदिर, ज्या ठिकाणाहून पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले जाणार आहे अशा भजनी मंडपाला, हनुमान मंदिर गरुड मंदिराला, राममंदिर, महाद्वार या सर्व ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आलेले भावीक महिला दर्शन झाल्यानंतर श्री राम मंदिरासमोरील मोकळ्या जागेत फुगड्यांचा खेळ खेळत होते. दरम्यानच्या काळात दर्शन बारी पालखी मार्गावरील श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी संत तुकाराम महारांजाच्या पादुकांना दुधाचा अभिषेख घालून पुजन करण्यात आले
इंद्रायणी स्नानवारीसोबत चाल चालणाऱ्या दिंड्या सकाळ पासूनचाला प्रदक्षिणा घालण्यासाठी शिष्यबद्ध पद्धतीने मंदिराच्या आवारात येत होत्या टाळ- मृदंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये आपली प्रदक्षिणा पूर्ण करून उत्तर दरवाजाने पुन्हा बाहेर जात होतो. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता.  आंघोळीनंतर पूजा पाठ करण्यात भाविक मग्न झाले होते.

नगरपंचायतीने गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचे पात्र स्वच्छ केले होते‌ परंतु पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्यामुळे त्याबरोबर वाहून आलेली पानफुटी यामळे भाविकांनाताना आंघोळ करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. 

मंदिर परिसरात गर्दीइंद्रायणी तीरावरील विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी होत होती, दुपारी बारानंतर मंदिराच्या आवारात दिंड्या दाखल होऊ लागल्या. दुपारी दोनच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम महाराज देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे अजित महाराज मोरे आदी उपस्थित होते. असतानाही वारकऱ्यांच्या आनंदात तसूरभरही कमतरता जाणवली नाही. मंदिराच्या आवारामध्ये वारकऱ्यांचे खेळ सुरू होते.  फुगड्या तसेच हरिनामाचा गजर सुरू होता.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाdehuदेहूPandharpurपंढरपूर