पुणे: राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या उपाध्यक्षपदी पुण्यातील ॲड. राजेंद्र उमाप यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे, तर नागपूर येथील परिजात पांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. उमाप यांनी याच टर्ममध्ये यापूर्वी ६ महिने उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये आणि दादर नगर हवेली, दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. निवडीनंतर उमाप म्हणाले की, वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वीचा कामाचा अनुभव असून, आणखी चांगल्या पद्धतीने काम करीन.
‘बार कौन्सिल’च्या उपाध्यक्षपदी ॲड. राजेंद्र उमाप
By विवेक भुसे | Updated: November 18, 2023 19:27 IST