शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांनी कुठला हट्ट कुठेही करु नये:  विक्रम गोखले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 18:26 IST

राष्ट्रपतींना दुसरी काही काम असतात की नाही? आपण समजून घेतले पाहिजे. प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल आहे. कोणीतरी पिल्लू सोडते. मग एकाने केला की दुसराही विरोध करतो.

ठळक मुद्देमंत्र्यांच्या हस्ते घेणार नाही असे म्हणणे चुकीचेराष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावा ही स्वाभाविक भावना

पुणे : राष्ट्रपतींच्याच हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळावा ही स्वाभाविक भावना आहे. मात्र, राष्ट्रपतींना आज जमत नसेल तर तो कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती कलाकारांनी करावी. मंत्र्याच्या हस्ते हा पुरस्कार घेणार नाही हे म्हणणे योग्य नाही. कलाकारांनी कुठला हटट कुठेही करू नये, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलाकारांना फटकारले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्याची परंपरा आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या हस्ते अकराच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या कलेची मोहर उमटविणा-या कलाकारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात गोखले यांना विचारले असता त्यांनी कलाकारांच्या भूमिकेवरच आक्षेप नोंदविला. ते म्हणाले, राष्ट्रपती भवनाकडून सरकारी नियमाप्रमाणे एक तास राष्ट्रपती येतील आणि अकरा पुरस्कार देऊन जातील आधी सांगितले असेल तर  मंत्र्यांकडून पुरस्कार घेणार नाही असे म्हणणे दुर्दैव आहे . जर असे झाले असते की संपूर्ण कार्यक्रमाला मी हजर राहाणार आहे आणि मग जाहीर करण्यात आले की ते उपस्थित राहणार नाहीत, तर हा रूसवा-फुगवा ठीक आहे. आधी सांगितले आहे एक तासासाठीच येणार आहे तर यात काही गैर नाही. यापूर्वी कधी असे  घडले नाही पण राष्ट्रपतींना दुसरी काही काम असतात की नाही? आपण समजून घेतले पाहिजे. प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल आहे. कोणीतरी पिल्लू सोडते. मग एकाने केला की दुसराही विरोध करतो. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावा ही स्वाभाविक भावना आहे. पण ते उपलब्ध नाहीत हे कळले असेल तर पुढच्या महिन्यात किंवा पंधरा दिवसांनी घ्या, त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घ्या, अशी विनंती करता येऊ शकते ना, परंतु, मंत्र्यांच्या हस्ते घेणार नाही असे म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दात बहिष्कार टाकणा-या कलाकारांना गोखले यांनी फटकारले. दरम्यान, मनोज जोशी यांनी विषय माहिती नसल्याने याविषयी बोलण्यास नकार दिला. 

टॅग्स :PuneपुणेVikram Gokhaleविक्रम गोखलेNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Ramnath Kovindरामनाथ कोविंद