शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाने पेलण्यासाठी कलावंतांचा एल्गार

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

सांस्कृतिक पर्यायाचा शोध : सोमवारी साताऱ्यात ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’

सातारा : शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेतून निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी राज्यभरातील युवा कलावंतांना एकत्र करण्याचा विडा ‘एल्गार कलामंच’ या संस्थेने उचलला आहे. पुण्यात मेअखेरीस पहिले सांस्कृतिक संमेलन होणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी साताऱ्यात येत्या सोमवारी (दि. ११) ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’ हा कार्यक्रम रंगणार आहे.शाहू कला मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी संस्थेचे अनिल म्हमाणे, धम्मरक्षित रणदिवे, शैलेश सावंत आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे कलावंत डफ घेऊन फिरत असून, बड्यांची देणगी न स्वीकारता कलावंतांचे संघटन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. म्हमाणे म्हणाले, ‘साम्राज्यवादाच्या सध्याच्या युगात जगासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. बाजारू व्यवस्थेवर आधारित असलेल्या या जगात शोषण वाढले आहे. जात, धर्म, वर्ग, वंशाच्या आधारावर हे शोषण होत असून, त्याची परिणती म्हणून हिंसक संस्कृती निर्माण होत आहे. यातून मार्ग काढून मानवमुक्तीचा पर्याय द्यावा लागणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक मार्गच इष्ट ठरेल.’ प्रतिनिधी)सांस्कृतिक संमेलन पुण्यालापुणे येथील शनिवार वाडा परिसरात दि. ३० व ३१ मे रोजी पहिले सांस्कृतिक संमेलन भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील कलावंत उपस्थित राहणार आहेत. कोणतीही औपचारिक बंधने न ठेवता कलावंतांना सादरीकरण करता यावे, अशा रीतीने संमेलनाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती म्हमाणे यांनी दिली.