शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

कला ही समाजाला जोडण्याचे करते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 02:20 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन : ३४ व्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : कला ही माणसाच्या मनाला विशाल बनविते, कलेतून माणसाला आनंद मिळतो. हीच कला समाजाला जोडण्याचेही महत्त्वपूर्ण काम करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी बुधवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ३४ व्या ‘युवास्पंदन’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उद्घाटन राजदत्त, अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विश्वविद्यालय संघाचे सहसचिव डेव्हिड सॅमसन, निरीक्षक सुरेंद्र मोहन कांत, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते.

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व गोवा या ४ राज्यातील ३२ संघ व ८०० विद्यार्थी या युवा महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. दुपारी तीन वाजता शोभायात्रेने महोत्सवाला सुरूवात झाली. मुख्य इमारतीपासून सुरू झालेली शोभायात्रा मुख्यमंडपात आल्यानंतर उद्घाटन कार्यक्रमाला सुरूवात झाली. राजदत्त म्हणाले, कला ही व्यक्ती व समाजाला आनंद देणारी बाब असते. युवास्पंदन महोत्सवाच्या निमित्तानेही हेच अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही कलेला पूर्णत्व नसते, याची जाणीव ठेवणारा कलावंत हा जिवंत असतो. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनीही हे जाणून घ्यावे.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, शिक्षणामधून कलेकडे दुर्लक्ष होत असताना, कलेचा जाणीवपूर्वक विचार करण्याचे काम अशा महोत्सवांमधून होत असते. युवकांसाठी हा काळ नवनिर्मितीचा काळ असतो. अशा महोत्सवांमधून युवकांनी कलेद्वारे स्वत:चा शोध घेण्याची गरज आहे. त्या आधारे मिळणाऱ्या संवेदना एकमेकांना तसेच समाजाला समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.तारुण्यावस्था हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ असतो, याच काळात बदल घडविण्याची क्षमता तरुणाईमध्ये असते, असे डेव्हिड सॅमसन यांनी सांगितले. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षकांनीही कलेमध्ये रुची वाढवावी, असे आवाहनही डॉ. नितीन करमळकर यांनी केले. परराज्यातील विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच, सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्याच्या संस्कृतीची महोत्सवासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी ओळख करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.युवा वर्गावर चांगले संस्कार या महोत्सवाच्या माध्यमातून होतील, असा विश्वास राजेश पांडे यांनी व्यक्त केला. डॉ. प्रभाकर देसाई यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. डॉ. संजय चाकणे यांनी आभार मानले.४०० स्वयंसेवकांची फौजच्युवास्पंदन महोत्सवासाठी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी अशा ४०० स्वयंसेवकांची फौज नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी २८ समित्या तयार करण्यात आल्या आहेत.च्स्पर्धक, परीक्षक, पाहुणे यांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे. कॅम्पसची स्वच्छता, बॅनर लावणे व इतर छोट्या मोठ्या जबाबदाºया स्वयंसेवकांकडून उचलल्या जात आहेत. अत्यंत आनंदाने ते या कामामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.शोभायात्रेने रंगतमहोत्सवाच्या शोभायात्रेला दुपारी तीनच्या सुमारास सुरूवात झाली. गुजरात विद्यापीठ, जयनरीन व्यास विद्यापीठ जोधपूर, पारूल विद्यापीठ, हेमचंद्र उत्तर गुजराथ विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, गुजरात तंत्रशिक्षण विद्यापीठ आणि यजमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी संघ या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्याची संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपारिक वेश परिधान केले होते. जोधपूर व गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपारिक नृत्य सादर केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश शोभायात्रेतून दिला. काही संघ पोहचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना शोभायात्रेमध्ये सहभागी हाता आले नाही.

टॅग्स :Puneपुणे