शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून गंडा घालणाऱ्या तोतयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:12 AM

पुणे : औरंगाबाद येथील ज्वेलर्स दुकानाला सील करण्याची ऑर्डर आली असल्याचे सांगून पुण्यातील एका ज्वेलर्सला फसविण्याचा प्रयत्न केलेल्या तोतया ...

पुणे : औरंगाबाद येथील ज्वेलर्स दुकानाला सील करण्याची ऑर्डर आली असल्याचे सांगून पुण्यातील एका ज्वेलर्सला फसविण्याचा प्रयत्न केलेल्या तोतया इन्कम टॅक्स ऑफिसरला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

राहुल सराटे (रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शशांक पुणेकर यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सराटे याने आपण इन्कम टॅक्स ऑफिसर राजेंद्र कदम बोलतो, असे सांगून त्यांच्या अक्षदा ज्वेलर्स या दुकानातून एका महिलेने कमी प्रतिचे सोने दिल्याची तक्रार केली असून, दुकान सील करण्याची ऑर्डर आली आहे, असे सांगून ही कारवाई रद्द करायची असल्यास गुगल पे अकाऊंटवर ३७ हजार २०० रुपये पाठवा, असे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने वापरलेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रिक विश्लेषण केल्यावर राहुल सराटे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. त्याला चेंबूरहून अटक केली.

सराटे याने फूड ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करून लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वेळप्रसंगी तो स्वत:च स्त्रीचा आवाज काढून जीएसटी ऑफिसर असल्याची बतावणी करून फसवत असे. त्याच्याविरुद्ध अंधेरी, बंगलोर सिटी, चेंबूर, डीसीबी, सीआयडी, लष्कर पोलीस ठाण्यात २०१६ पासून गुन्हे दाखल आहेत. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्र्या इतर १० व्यावसायिकांची त्याने फसवणूक केली असून त्याचा तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.