पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्वप्निल तानाजी मारणे (वय २२, रा. धायरी) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांनी एक गावठी कट्ट्यासह एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. मारणे याला कसबा पेठेतील कुंभार वेस चौकामध्ये शनिवारी दुपारी जेरबंद करण्यात आले. त्याने पिस्तूल कोठून आणले आहे, तसेच कशासाठी आणले आहे, त्याचे आणखी साथीदार आहेत काय, याचा तपास करायचा असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी मान्य केली. याप्रकरणी पोलीस नाईक केदार आढाव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
बेकायदा पिस्तूल बाळगल्याने अटक
By admin | Updated: January 12, 2015 02:30 IST