वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अट्टल गुन्हेगारांचा शोध घेतला असता ऋषिकेश पवारचे नाव या यादीत आढळले. पवार याने त्याच्या परिसरात त्यांच्या साथिदारांच्या साहाय्याने दहशत निर्माण केली होती. नागरिकांना धाक दाखवून त्याच्याकडून जबरदस्तीने पवार हा खंडणी वसूल करत होता. असे अनेक गुन्हे त्याच्यावर होते. यामुळे मोकाशी यांनी पवार यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST