शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत सेना-राष्ट्रवादी आघाडी, एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:24 IST

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज शिवसेना-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी झाली असून आघाडीच्या वतीने रेश्मा मनोज खोमणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.या पोटनिवडणुकीत राज्यमंत्री विजय शिवतारे, आणि दिलीप बारभाई यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय अशी शहर विकास आघाडी स्थापन करीत असून आघाडीचा एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे, असे आघाडीचे प्रवर्तक दिलीप यादव यांनी यावेळी सांगितले.याच बरोबर भाजपाच्या वतीने हेमंत अलका शिंदे यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, तालुका अध्यक्ष सचिन लंबाते, शहराध्यक्ष अशोक खोमणे, तालुका विस्तारक जीवन जाधव आदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरअड विजया वसंत नाझीरकर यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.>काँग्रेसकडून दोन उमेदवारी अर्ज दाखलजेजुरी : कॉँग्रेसच्या वतीने शहरातून मिरवणुकीने येऊन प्राजक्ता रवींद्र जोशी आणि रत्ना गणेश मुंडलिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्तेचा गैरवापर करून नगराध्यक्षपदाच्या वीणा सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला. येत्या २९ तारखेला याचा निकाल होईलच. निकाल काहीही असो, आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली असून कोणीही, कोणत्याही आघाड्या केल्या तरी काँग्रेसचाच विजय निश्चित असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले. जेजुरी पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (इतर मागास महिला) असे आहे. कुमारी प्राजक्ता रवींद्र जोशी यांनी दोन अर्ज दाखल केले. कुमारी प्राजक्ता जोशी या २१ वर्षे पूर्ण असून सर्वांत तरुण उमेदवार आहेत. त्यांचे एम.बी.ए.चे शिक्षण सुरू आहे. दुसºयात उमेदवार रत्ना मुंडलिक या कॉँग्रेसच्या महिला अध्यक्षा आहेत.>भाजपाच्या अर्जात नाव चुकले की चुकवले?राज्यात व केंद्रात सत्तेत असणाºया भाजपाचा पालिका निवडणुकीत एकमेव उमेदवारी अर्ज अलका हेमंत शिंदे यांनी दाखल केला असला तरीही उमेदवारी अर्जात त्यांनी स्वत:चे नाव मात्र हेमंत अलका शिंदे असे लिहिलेले आहे. यामुळे भाजपावर नामुष्कीची वेळ आली असून एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या अर्जात नाव चुकलेले असल्याने मोठी चर्चा राजकीय वतुर्ळातून होत आहे.

टॅग्स :Puneपुणे