शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:56 IST

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती.

पुणे - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेजर शशिधर नायर यांना वीरमरण आले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईन असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शशिधर परत आले पण काहीही बोलले नाहीत. यावेळी ते परतले ते थेट तिरंग्यात लपेटून. 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. कारण, नुकतीच कुठे तृप्ती आणि शशिधर यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघाच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आर्मीच्या सर्कलमध्येही या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगत होती. मात्र, काळाने घात केला आणि तृप्ती अन् भारतमातेचा रिअल हिरो आपल्याला सोडून गेला. 

शशिधर आणि तृप्ती यांची पुण्यातच एका म्युचुअल मित्रामुळे भेट झाली. पहिल्याच नजरेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी, शशि 27 वर्षांचे आणि तृप्ती 26 वर्षांच्या होत्या. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. मात्र, साखरपुड्याच्या 8 महिन्यानंतर तृप्ती यांना गंभीर आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली. त्यांना चक्क व्हीलचेअरची गरज भासू लागली. त्यावेळी, मित्रांनी शशि यांना लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतमातेप्रमाणेच तृप्तीवरही तितकेच प्रेम करणाऱ्या शशिधर यांनी मित्रांना स्पष्ट नकार दिला. तसेच तृप्तीला दिलेल्या वचनाप्रमाणे 2012 मध्ये तिच्याशी लग्न केलं. तृप्तीला स्वीकारून आयुष्याच्या परीक्षेत मेजर शशि फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाला होता. पण, तृप्ती यांचा हा आजार अधिकच वाढत गेला. तरीही, शशि यांनी कधीच तक्रार केली नाही. उलट, रुग्णालयात नेण्यापासून तिची सर्व काळजी ते घेऊ लागले. त्यामुळे काही दिवसांतच आर्मीच्या सर्कलमध्येही हा जोडा सर्वांचा लाडका बनला. 

शशि यांची पोस्टींग हा तृप्ती यांच्यासाठी नेहमीच चिंतेच कारण असायचा. मात्र, शशि दरवेळी जाताना मी लवकच परत येईन, असे सांगून जायचे. पुण्यात एक महिन्यांची सुट्टी घालवल्यानंतर 2 जानेवारी रोजी शशि यांनी पत्नीला अलविदा केले. जाताना, लवकरच परत येईल, असे वचनही दिले. नेहमीप्रमाणे यावेळीही शशिने तृप्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. पण, यावेळी तो परतला, ते तिरंग्यात लपेटून. तृप्तीवर जिवापाड प्रेम करणारा शशि भारतमातेवरील प्रेमाखातर शहीद झाला होता. शशिला वीरमरण आले होते. 

टॅग्स :Indian Army Dayभारतीय सैन्य दिनMartyrशहीदLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान