शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

बेलगामपणाला लागला चाप

By admin | Updated: December 10, 2014 00:11 IST

राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे.

पिंपरी : राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे. त्यांच्याविरोधात पदाधिका:यांपासून कर्मचारी-अधिका:यांच्याही तक्रारी आहेत. परंतू, पद आणि राजकारण्यांनी दिलेले बळ यामुळे उघडपणो तक्रारी कोण करत नव्हते. मात्र दरोडय़ाचा गुन्हा खंडाळा पोलीसांनी मंगळवारी दाखल केल्याने आता शिंदे यांच्याविरोधात महापालिकेशी संबधीत अनेकजण उघडपणो बोलू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वडवाडी-शिरवळ येथे शासनाची पिवळा दिवा असलेली मोटार घेऊन जात तेथील शेतक:यांना जमीनीच्या वादातून धमकावल्याबद्दल खंडाळा पोलिसांनी मंगळवारी शिंदे यांच्यावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला. या निमित्ताने  जकात अधीक्षक ते अतिरिक्त आयुक्त असा प्रवास असणा:या शिंदे यांचे कारनामे आता उघड होतील, अशी चर्चा महापालिका वतरूळात होती. 
जकात अधिक्षक, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त पद भूषविल्यानंतर 28 जून 2क्13 ला अतिरिक्त आयुक्त म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाली होती. महापालिकेत त्यांचे नाव विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे ‘व्यावसायिक हित संबंध’ आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी शिंदेंना महापालिकेत आणण्यासाठी एका वजनदार नेत्याने लॉबिंग केले होते. 
अतिरिक्त आयुक्तपदी रूजू झाल्यानंतर त्यांच्या कक्षात बिल्डर, जमीन खरेदी विक्री करणारांचाच राबता असायचा. कार्यालयात बसून ते मावळ, मुळशी, खेडमधील शेतक:यांना बोलवून दमबाजी करीत असल्याच्या तक्रारीही यापूर्वी शेतक:यांनी केलेल्या आहेत.  फुकटचा फौजदार म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्या विरोधात ब्र काढायलाही महापालिकेतील इतर अधिकारी धजावत नसत. निविदा प्रक्रियेत असणारी अधिकारी नगरसेवक यांच्यातील रिंग यामध्येही ते महत्त्वाची भूमिका बजवीत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांच्या कार्यपद्धतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर उमेदवारांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच उमेदवारी अर्ज भरताना, निवडणूक निर्णय अधिका:यांच्या कक्षात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी  यांना सोडण्यात पक्षपातीपणा करीत होते. डमी उमेदवार निवडणूकीत उतरविण्याविषयी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. निवडणूक निर्णय अधिका:यांच्या कक्षात सोडण्यावरून त्यांच्याशी  पत्रकारांशीही शाब्दिक वादावादी झाली होती. अतिरिक्त आयुक्तांच्या वाहनाला पिवळा दिवा लावण्याची परवानगी नाही. मात्र, केवळ अगिAशामक विभागाचा कार्यभार त्यांच्यावर असल्याने गाडीला पिवळा दिवा लावून ते ग्रामीण भागात फिरत असल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. शिंदे यांना असलेले राजकीय बळ पाहून आयुक्त राजीव जाधव यांनी  बोटचेपेपणाची भूमिका घेतली. याचमुळे त्यांचे शिंदे यांचा बेलगामपणा वाढला होता. मात्र आता  दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
 
पदाचा गैरवापर करणा:या अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी अवघ्या तीनच दिवसांपूर्वी ‘आम आदमी’ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिंदे यांच्या कार्यकालात झालेल्या निविदा प्रक्रिया, दिलेले ठेके संशयास्पद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची व मालमत्तेची ‘सीआयडी’तर्फे चौकशी करावी, असेही या पत्रत म्हटले आहे.दरम्यान, शेतक:यांना ंिशंदे यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध मराठी साम्राज्य सेनेच्या वतीने सागर मंटगीकर यांनी पत्रकाव्दारे केला आहे.