लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : मुरुम येथे दि. ८ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांचे ठराव मंजूर करण्यात आले.सरपंच प्रदीप कणसे यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रामसभेत आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध विषयांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना राबविणे, १४ व्या वित्त आयोगातील विकास आराखड्याला मंजुरी, ग्रामदैवत भैरवनाथ पालखी मार्ग डांबरीकरण करणे या विषयांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच गावातील अंतर्गत रस्ते, वाड्यावस्त्यांवरील रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्याची परवानगी देण्यात आली. ग्रामसभेला राजवर्धन शिंदे, कुमार शिंदे, हंबीरराव जगताप, प्रकाश जगताप, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, उपसरपंच नंदकुमार जगताप, महेश शिंदे, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक डी. डी. लोणकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन विषयपत्रिकेचे वाचन केले.
मुरूमच्या विशेष ग्रामसभेत विविध विषयांना मंजुरी
By admin | Updated: May 11, 2017 04:09 IST