शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 02:50 IST

आठवड्यात मिळणार पंचायत समित्यांना आदेश; १२ वर्षांनतर मिळाला लाभ

बारामती : जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या मागील वर्षभरापासून रखडलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. याबाबत आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील पंचायत समित्यांना आदेश देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.शिक्षकांना प्रत्येक १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. हा वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ नेहमीच्या वेतनवाढीशिवाय असतो; मात्र जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव रखडला होता.१२ वर्षं सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येते. वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीची शिक्षकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेतील खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, बारामती, भोर, शिरूर, दौंड, मुळशी, मावळ, पुरंदर, इंदापूर तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये सादर होऊनही मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत. सातत्याने प्रशासनाकडे मागणी करूनही प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांमधून नाराजी होती. या निर्णयाचे स्वागत जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे....तर जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईवरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षकांना देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी तत्काळ सेवा पुस्तकामध्ये नोंद करावी. एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष पगारात लाभ देण्यात यावा; अन्यथा संबंधित पंचायत समितीमधील जबाबदार कर्मचाºयांविरोधात कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मारणे यांनी सांगितले.शिक्षकांना नवीन वर्षाची भेट ...१२ तालुक्यांतील ६३४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. शिक्षकांचे अन्य प्रलंबित प्रश्नही तत्काळ मार्गी लावले जातील, शिक्षकांना ही नवीन वर्षाची भेट आहे.- विवेक वळसे-पाटीलउपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

टॅग्स :Teacherशिक्षकBaramatiबारामती