शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सीओईपीच्या ५४ प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 00:28 IST

शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) २००८ मध्ये केलेल्या ७१ पैकी ५४ प्राध्यापकांच्या नियुक्त्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.

पुणे : शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) २००८ मध्ये केलेल्या ७१ पैकी ५४ प्राध्यापकांच्या नियुक्त्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. सीओईपीने योग्य प्रक्रिया पार न पाडता या नियुक्त्या केल्याचा ठपका ठेवत त्या रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती एच दांगडे यांनी दिला आहे.सीओईपी हे पुण्यातील १६६ वर्षे जुने इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. राज्य शासनाने आयआयटीच्या धर्तीवर इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी २००२ साली टेक्निकल एज्युकेशन इंम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम हाती घेतला होता. त्याअंतर्गत सीओईपीसह राज्यातील ३ महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. त्याअंतर्गत सीओईपीने २००८ ते २०१३ या काळामध्ये ७१ प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, ही भरती प्रक्रिया राबविताना नियमांचे पालन करण्यात आले नाही, पात्रताधारक प्राध्यापकांची निवड करण्यात आली नाही, अशी तक्रार आभियांत्रिकी महाविद्यालय राजपत्रिक अधिकारी महासंघाने राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी शासनाने चौकशी समिती नेमली. या समितीच्या चौकशीमध्ये महासंघाने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याविरोधात सीओईपी प्रशासन, संबंधित प्राध्यापक तसेच आभियांत्रिकी महाविद्यालय राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.सीओईपीला राज्य शासनाने स्वायत्तता दिली आहे, त्यामुळे प्राध्यापकांची नियुक्त्या करण्याचा अधिकार महाविद्यालयास आहे, अशी बाजू सीओईपीकडून मांडण्यात आली. राज्य शासनाने मात्र समितीने दिलेला नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय योग्य असून त्यानुसार कार्यवाही असे म्हणणे मांडले. संबंधित प्राध्यापकांनी आम्हांला नोकरीमधून दूर करणे अन्यायकारक असल्याचे न्यायालयास सांगितले.>राज्य शासनाला नियुक्ती व बडतर्फीचे सर्व अधिकारराज्य शासनाने सीओईपीला स्वायत्तता दिली असली तरी या महाविद्यालयालातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे वेतन शासनाकडून अदा केले जाते.तसेच इतर अनेक प्रकारचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यामुळे महाविद्यालयास स्वायत्तता असली तरी प्राध्यापकांची नियुक्ती व बडतर्फीचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाला असल्याचे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.>उच्च न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये नियुक्त केलेल्या ७१ पैकी ५४ प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालय व शासनास केल्या आहेत. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी अपिल करेपर्यंत निर्णयाच्या अंमलबजावणी स्थगिती देण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय