पुणो : ऐनवळी एका पक्षाच्या फांदीवरून दुस:या पक्षाच्या फांदीवर जाणारे उमेदवार.. एकाच पक्षाच्या दोघांना देण्यात आलेले एबी फॉर्म.. तसेच एकाच पक्षाच्या अनेकांनी दाखल केलेली उमेदवारी.. अशा गोंधळाच्या वातावरणात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 27) तब्बल 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतून 561 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा ते दुपारी 3 वाजेर्पयत एबी फॉर्मसह अर्ज भरणो आवश्यक होते. अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असताना शिवसेना- भारतीय जनता पक्ष युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी तुटली. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणावर अर्ज दाखल झाले. शुक्रवारी 142 व शनिवारी 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
आपले नावही पक्ष पातळीवर चर्चेत असावे यासाठी देखील अनेक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल
केले आहेत.
या शिवाय डमी अर्ज दाखल करणारे उमेदवार, पक्षाकडून दोघांना देण्यात आलेले एबी फॉर्म अथवा नाराजी प्रकट करण्यासाठी देखील अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (दि. 29) अर्ज छाननी असून, 1 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. (प्रतिनिधी)
4इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 45 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
4पिंपरी 4क्, भोसरी, वडगावशेरी प्रत्येकी 35 व खडकवासल्यातून 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
4कोथरूड मतदारसंघातून सर्वात कमी 15 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
4जिल्ह्यात आंबेगाव मतदारसंघात सर्वात कमी 16 उमेदवारांनी
अर्ज दाखल केले.